Mumbai Monsoon Update: मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची लोकल 15 मिनिटे उशिराने

तसेच सोमवारी रात्री पासून पावसाची कोसळधार सुरु असल्याने मध्य रेल्वेची लोकल आज 15 मिनिटे उशिराने धावत आहे.

Monsoon 2019 (Photo Credits: IANS)

Monsoon 2019: गणपती बाप्पाचे आगमन धुमधडाक्यात झाले असले तरीही रविवारपासून सुरु झालेल्या पावसाने चांगलाच जोर पकडल्यामुळे गणेश भक्तांच्या आनंदावर थोडे विरजण पडल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सोमवारी रात्री पासून पावसाची कोसळधार सुरु असल्याने मध्य रेल्वेची (Central Railway) लोकल आज 15 मिनिटे उशिराने धावत आहे. मुंबईसह ठाणे (Thane), कल्याण (Kalyan), डोंबिवली (Dombivali) भागात मुसळधार पाऊस सुरु असून अनेक भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईतही पावसाचा जोर कायम असून मुंबईतील सखल भाग असलेल्या दादर, हिंदमाता आणि सायन परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. दादर, अंधेरी, मिरारोड, वसई, पालघर, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईत पावसाचा जोर कायम आहे.

हेही वाचा- Mumbai Monsoon Update: मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची लोकल 15 मिनिटे उशिराने

मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरांत रात्रीपासून पावसाला सुरूवात झाली असली तरी पहाटे ४ वाजता पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. मात्र पुन्हा सकाळी पावसाचा जोर वाढल्याने मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली.

पावसाचा जोर असाचा कायम राहिला तर आज दीड दिवसांच्या घरगुती बाप्पांच्या विसर्जन सोहळ्यात विरजण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व पोलिस यंत्रणा आणि वाहतूक यंत्रणेला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.