मुंबई: मोनोरेल मध्ये लागणार लग्न, साजरा करता येणार वाढदिवस; तोटा भरून काढण्यासाठी MMRDA चा मोठा निर्णय

मुंबई मोनोरेल (Monorail) या लग्न, वाढदिवस यांसारख्या सेलिब्रेशनसाठी भाड्याने देण्याचा MMRDA चा निर्णय आहे, यातून मोनोरेलचा डबघाईला आलेला बिझनेस सुधारण्यात मदत होईल आणि तोटा नफ्यात बदलता येईल असा हेतू आहे.

Mumbai Monorail To Be Rented For Wedding & Birthdays (Photo Credits: Pexels And Pixabay)

डेस्टिनेशन वेडींग (Destination Wedding) हा प्रकार अलीकडे खूप गाजलाय, लग्नच काय तर वाढदिवस, छोट्या मोठ्या पार्ट्या, समारंभ हे सुद्धा युनिक पद्धतीने साजरे करता यावेत याकरिता कुठेतरी हटके ठिकाणी जाण्याचा अनेकांचा मानस असतो, पण खरं पाहायचं तर अख्ख्या कुटुंबाला घेऊन कुठे बाहेर जाणं म्हणजे सेलिब्रेशन कमी आणि डोक्याला तापच जास्त होतो, बरोबर ना? पण अशा मंडळींसाठी त्यांची इच्छा पूर्ण होईल असा एक हटके पर्याय MMRDA कडून तयार करण्यात आला आहे. यापुढे मुंबई मोनोरेल (Monorail) या लग्न, वाढदिवस यांसारख्या सेलिब्रेशनसाठी भाड्याने देण्याचा MMRDA चा निर्णय आहे, यातून मोनोरेलचा डबघाईला आलेला बिझनेस सुधारण्यात मदत होईल आणि तोटा नफ्यात बदलता येईल असा हेतू आहे. मुंबईकरांसाठी खुशखबर! Mumbai Metro स्टेशनवर मिळणार बँक, ATM सह Spa ची सुविधा

प्राप्त माहितीनुसार, 7 वर्षांपूर्वी सुरु झालेला तब्बल 2700 कोटींचा मोनोरेल प्रकल्प आतापर्यंत प्रतिदिन 8.5 लाख रुपयांच्या तोट्यात आहे. हा तोटा भरून काढण्याचा हा अनोखा मार्ग आता MMRDA कडून तयार करण्यात आला आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दी नसण्याच्या वेळेत मोनोरेल या कार्यक्रमासाठी भाड्याने देण्यात याव्यात ज्यामुळे पडून राहणाऱ्या गाड्यांचा पैसे कमावण्यासाठी वापर करता येईल असा या निर्णयाच्या मागील हेतू आहे.

दरम्यान, फेब्रुवारीपर्यंत दररोज 15,000 प्रवासी संख्या वाढवण्याच्या तर येत्या काही महिन्यांमध्ये 25,000 पर्यंत वाढ करण्यासाठी MMRDA प्रयत्नशील असणार आहे, यासाठी मोनोरेल मार्फत अन्य काही भाग देखील जोडून घेण्याचा विचार आहे, तसेच दोन रुळांची संख्या वाढवून गाड्यांमधील जास्तीत जातीस अंतर हे 15 मिनिट करता येईल असाही विचार सुरु आहे. या प्रकल्पाच्या सुरुवातीला मोनोरेल मधून तब्बल 6 कोटी प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा होती मात्र आतापर्यंत MMRDA ला केवळ 46 लाख प्रवाशांचा टप्पाच पार करता आला आहे.