Mumbai Gang Rape: मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी 6 जणांना अटक
दिवसेंदिवस या घटना वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. जगभरातही महिलांवरील अत्याचार हा मुद्दा गांभीर्याने नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्यामुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जगभरात स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत प्रयत्न केले जात आहेत. का
मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Mumbai Minor Gangrape Case) झाल्याची घटना पुढे येत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. ही घटना मुंबई येथील मालवणी परिसरात (Malvani area) घडल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी 16 वर्षांची आहे. पोलिसांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना म्हटले आहे की, सर्व आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम 376 आणि पॉस्को कायद्यांतर्गत (POSCO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आधीही मुंबईत सामूहिक बलात्काराच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील बांद्रा परिसरात एका 20 वर्षीय तरुणांवर चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणातही पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी सांगितले होते की, 12 मे या दिवशी सायंकाळी हे चौघेही कपडे खरेदी करण्यासठी शिवाजी मार्केट येथे गेले होते. परंतू, लॉकडाऊन असल्याने हे मार्केट बंद होते. मार्केट बंद असल्याने या चौघांनी बँडस्टँड येथे जाण्याचा निर्णय घेतला. येथे या चौंघांनी एकट्या असलेल्या तरुणीवर बलात्कार केला. (हेही वाचा, पुणे: प्रियकरासोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार)
केवळ मुंबईच नव्हे तर देशभरात महिलांवरील बलात्कार, सामूहिक अत्याचार, सामूहिक बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या अनेक घटना घडत असतात. दिवसेंदिवस या घटना वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. जगभरातही महिलांवरील अत्याचार हा मुद्दा गांभीर्याने नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्यामुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जगभरात स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत प्रयत्न केले जात आहेत. काही प्रमाणात त्याला यश येते आहे. परंतू, अद्यापही अशा घटनांचे प्रमाण कमी होण्याचे प्रमाण आजही अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने कमीच आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा नेहमीच ऐरणीवर राहिला आहे.