IPL Auction 2025 Live

मुंबई: MHADA कडून आज BDD Chawl रहिवाशांसाठी पहिल्या टप्प्यातील सोडत जाहीर होणार!

महाराष्ट्र हाऊसिंग अ‍ॅन्ड एरिया डेव्हल्पमेंट अर्थात म्हाडा (MHADA) कडून आज मुंबईमध्ये एन एम जोशी मार्गावरील (NM Joshi Marg) बीडीडी चाळीतील काही रहिवाशांच्या घरासाठी सोडत निघणार आहे.

Mhada Lottery | (Photo credit: archived, edited, representative image)

महाराष्ट्र हाऊसिंग अ‍ॅन्ड एरिया डेव्हल्पमेंट अर्थात म्हाडा (MHADA) कडून आज मुंबईमध्ये एन एम जोशी मार्गावरील (NM Joshi Marg) बीडीडी चाळीतील काही रहिवाशांच्या घरासाठी सोडत निघणार आहे. आज सुमारे 272 भाडेकरूंसाठी ही सोडत आहे. यांना ट्रान्झिट मध्ये हलवण्यात आले होते. या भागात एकूण 700 भाडेकरू असून त्यांच्यापैकी 607 भाडेकरू पात्र ठरले आहेत. दरम्यान आज दुपारी 12.30 च्या सुमारास संगणकीय पद्धतीने ही सोडत जाहीर केली जाणार आहे.

एन एम जोशी मार्गावरील बीडीडी चाळीतील रहिवाशांची ही सोडत मार्च महिन्यातच जाहीर होणं अपेक्षित होते मात्र कोविड19 मुळे हा प्लॅन पुढे ढकलण्यात आला आहे. आता आज या सोडतीचा पहिला टप्पा पार पडणार आहे. नक्की वाचा:  MHADA Lottery 2021: आता सर्वसामन्यांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण; लवकरच लागणार म्हाडाची 7,500 घरांची बंपर लॉटरी.

रिपोर्ट्सनुसार, आज लॉटरी ड्रॉ मध्ये भाडेकरूंना कोणत्या फ्लोअर वर नव्या इमारती मध्ये त्यांना फ्लॅट्स मिळणार याची माहिती दिली जाणार आहे. नव्या घराचे अ‍ॅग्रिमेंट देखील यावेळी मोफत साईन केले जाणार आहे. मात्र या म्हाडाच्या घराच्या सोडतीला अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांचा विरोध आहे.

कालच पालघर पोलीस दलातील 109 कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे विरार बोळींज इथं उभारलेल्या गृहनिर्माण योजनेतील इमारत क्रमांक 10 मधील सदनिका क्रमांकांची निश्चिती व वितरण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. इथे पहा त्यांची यादी.

म्हाडा कोकण मंडळात अर्थात ठाणे, कल्याण परिसरात तब्बल 7500 घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये म्हाडा ही लॉटरी जाहीर करणार आहे. अशी माहिती देखील  जितेंद्र आव्हाड यांनी कालच्या कार्यक्रमामध्ये दिली आहे.