Mumbai MHADA Lottery 2023: मे महिन्याच्या अखेरीस म्हाडा मुंबईच्या घरांसाठी सोडत जाहीर होण्याची शक्यता

मे महिन्याच्या अखेरीस म्हाडा मुंबईतील घरांसाठी जाहिरात जाहीर करून पुढे जुलै, ऑगस्ट महिन्यात सोडत काढून घरं देण्याची शक्यता आहे.

Mhada | (Photo credit: archived, edited, representative image)

कोकण (Konkan Division) विभागानंतर आता म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या (MHADA Mumbai Division) लॉटरीची लोकांना प्रतिक्षा आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार मुंबईच्या गोरेगाव (Goregaon) भागामध्ये म्हाडाच्या घरांसाठीची लॉटरी जाहीर होऊ शकते. सुमारे साडेतीन हजार घरांचा यामध्ये समावेश होऊ शकतो. मे महिन्याच्या अखेरीस जाहिरात आणि पुढे जुलै, ऑगस्ट महिन्यात सोडत काढून घरं दिली जातील. असा अंदाज आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

मुंबई मध्ये कोणत्या प्रकल्पात कोणती आणि किती घरं बांधून तयार आहेत? याची तपासणी सध्या सुरू आहे. अभियंतांकडून माहिती गोळा करून त्यानुसार यादी बनवली जाईल आणि लवकरच त्याची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल असा अंदाज आहे.

घरांची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही परंतून अंदाजानुसार ईडब्लूएस घरांच्या किंमती 35 लाखांच्या आसपास असतील. लो इन्कम ग्रुपच्या घराच्या किंमती 45 लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. सरकारच्या नव्या नियमांनुसार आता ज्या इमारतींना ओसी, सीसी मिळाली आहे केवळ त्याच इमारतींचा लॉटरीमध्ये समावेश केला जाणार आहे. गोरेगाव पहाडी भाग़ात सध्या 2600 घरं मुंबई मध्ये तयार आहेत. Mumbai MHADA Lottery 2023: मुंबईत म्हाडा चार हजार घरांसाठी काढणार सोडत, गोरेगाव येथे 2, 638 घरांचा प्रकल्प, जाणून घ्या, सविस्तर माहिती .

मुंबई मध्ये यापूर्वी लॉटरी 2019 मध्ये जाहीर झाली होती. त्यानंतर मुंबईत लॉटरी जाहीर झालेली नाही. म्हाडा द्वारा सामान्यांच्या आवाक्यात येतील अशी दर्जेदार घरं लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.