Mumbai MHADA Lottery 2023: म्हाडा मुंबई च्या घरांची प्रतिक्षा अखेर संपली; 18 जुलै दिवशी सोडत 22 मे पासून करा अर्ज!

उच्च उत्पन्न गटामध्ये केवळ 39 घरं आहेत.

Mhada | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबईकरांची म्हाडा (Mumbai MHADA) च्या घरासाठीची प्रतिक्षा अखेर संपली आहे. मुंबई मध्ये 4083 घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. 22 मे दिवशी त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल तर 18 जुलै दिवशी त्यासाठीची सोडत काढली जाणार आहे. मुंबई मध्ये वांद्रे भागात असलेल्या रंगशारदा सभागृहामध्ये त्याची सोडत काढली जाणार आहे. म्हाडा मुंबई विभागीय मंडळातील घरांच्या सोडतीसाठी अर्जांची विक्री आणि स्वीकृती 22 मे पासून सुरू होणार आहे.  अनामत रकमेसह अर्ज भरण्याची अंतिम मुदत 26 जून पर्यंत असणार आहे.

मुंबई मध्ये गोरेगाव पहाडी, विक्रोळी कन्नमवार नगर, अ‍ॅटॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर, सायन परळ, ताडदेवमध्ये घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. 2019 नंतर मुंबई मध्ये म्हाडाच्या घरांसाठी सोडत काढली गेली नव्हती त्यामुळे स्वप्नातील घर सामान्यांच्या आवाक्यात आणणार्‍या म्हाडाच्या या घरांच्या सोडतीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते.

रिपोर्ट्सनुसार, या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 2788, अल्प उत्पन्न गटासाठी 1022, मध्यम उत्पन्न गटासाठी 132 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 39 घरे उपलब्ध असतील. अत्यल्प उत्पन्न गटात गोरेगावमधील पहाडी इथल्या पंतप्रधान आवास योजनेतील 1947, अँटॉप हिलमधील 417 तर, विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील 424 अशी एकूण 2 हजार 788 घरांचा समावेश आहे.नक्की वाचा: MHADA Houses: ‘म्हाडा’तर्फे येत्या आर्थिक वर्षात तब्बल 12,724 सदनिका प्रस्तावित; जाणून घ्या मुंबई, पुणेसह कोणत्या प्रादेशिक मंडळात किती घरे बांधले जाणार.

अल्प उत्पन्न गटामध्ये 1022 घरांचा समावेश आहे तर मध्यम उत्पन्न गटात 132 घरांचा समावेश आहे. उच्च उत्पन्न गटामध्ये केवळ 39 घरं आहेत. उच्च गटासाठी घरं ताडदेव, लोअर परळ, सायन, शिंपोली, तुंगा पवई या ठिकाणी आहेत.