Mumbai MHADA House: मुंबई येथील दादर, अँटॉप हिल, सायन, परळ, मुंबई सेंट्रल, गोरेगाव, विक्रोळी, जुहू परिसरातील म्हाडाच्या 83 हजार घरांसाठी सोडत; घ्या जाणून
प्रामुख्याने दादर, अँटॉप हिल, सायन, परळ, मुंबई सेंट्रल, गोरेगाव, विक्रोळी, जुहू आणि अंधेरी आदी भागांतील घरांचा या सोडतीत समावेश असेल. सदर सोडतीसाठी अर्जविक्री, नोंदणी, आणि अर्जस्वीकृती प्रक्रिया 22 मे पासूनच सुरु होणार आहे.
MHADA Lottery Mumbai: मुंबई शहरात घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या (MHADA) मुंबई मंडळातील जाहीर झालेल्या तब्बल 4083 घरांसाठी जाहीरात प्रसिद्ध होणार आहे. ही जाहीरात सोमवारी म्हणजेच 22 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. या सोडतीमध्ये मुंबईतील अनेक ठिकाणच्या घरांचा समावेश आहे. प्रामुख्याने दादर, अँटॉप हिल, सायन, परळ, मुंबई सेंट्रल, गोरेगाव, विक्रोळी, जुहू आणि अंधेरी आदी भागांतील घरांचा या सोडतीत समावेश असेल. सदर सोडतीसाठी अर्जविक्री, नोंदणी, आणि अर्जस्वीकृती प्रक्रिया 22 मे पासूनच सुरु होणार आहे.
म्हाडाच्या घरांसाठीची सोडत मुंबईतील 18 जुलै रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात काढली जाणार आहे. दरम्यान, या सोडतीत पहाडी गोरेगावे येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठीही घरे उपलब्ध आहेत. जी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आहेत. ही घरे 305 चौरस फुटांची असून त्यांची संख्या 1047 इतकी आहे. ज्याची किंमत 33 लाख 44 हजार इतकी आहे. अल्प गटासाठी 1022 तर मध्यम गटासाठी 132 घरे आहेत. उच्च गटासाठी 39 घरे आहे. या सर्वांची सोडत 18 जुलै रोजी होणार आहे. (हेही वाचा, Mumbai MHADA Lottery 2023: म्हाडा मुंबई च्या घरांची प्रतिक्षा अखेर संपली; 18 जुलै दिवशी सोडत 22 मे पासून करा अर्ज!)
MHADA
म्हाडा म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण. MHADA ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे, जी परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या विकासासाठी आणि व्यवस्थापनासाठी तसेच राज्यातील गृहनिर्माण आणि शहरी विकासाचे नियमन करण्यासाठी काम करते. म्हाडाची स्थापना 1977 मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास कायद्यांतर्गत झाली. महाराष्ट्रातील अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांना परवडणाऱ्या घरांचे पर्याय उपलब्ध करून देणे हे म्हाडाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. निवासी इमारतींचे बांधकाम, पुनर्विकास प्रकल्प आणि लॉटरी पद्धतीने घरांचे वाटप यामध्ये संस्थेचा सहभाग आहे.
म्हाडा नियमित गृहनिर्माण लॉटरी आयोजित करते जेथे पात्र अर्जदार परवडणाऱ्या घरांसाठी अर्ज करू शकतात. या लॉटऱ्या अशा व्यक्तींसाठी खुल्या आहेत ज्या विशिष्ट निकष पूर्ण करतात, जसे की उत्पन्न मर्यादा आणि निवासी आवश्यकता. त्यानंतर निवडलेल्या अर्जदारांना परवडणाऱ्या किमतीत घरांचे वाटप केले जाते.
गृहनिर्माण आणि वाटपाच्या व्यतिरिक्त, म्हाडा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि शहरी नूतनीकरण उपक्रम देखील हाती घेते. झोपडपट्टीतील रहिवाशांच्या राहणीमानात सुधारणा करून त्यांना उत्तम घरांचे पर्याय आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. म्हाडाची महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये प्रादेशिक कार्यालये आहेत आणि ते परवडणारी घरे आणि शाश्वत शहरी विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणे, विकासक आणि इतर भागधारकांशी जवळून काम करते.