Mumbai Metro ची रेड लाईन 7, यलो लाईन 2A येत्या 3-4 महिन्यात सुरू होण्याची शक्यता; MMRDA ची माहिती

मुंबई मेट्रोच्या लाईन 7 वर अंधेरी ईस्ट ते दहिसर ईस्ट ही रेड लाईन आणि दहिसर वेस्ट ते डीएन नगर ही यलो लाईन यासाठी 2016 पासून काम सुरू आहे.

Metro | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबई मेट्रोची रेड लाईन 7 आणि यलो लाईन 2A येत्या 3-4 महिन्यात सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती MMRDA ने दिली आहे. MMRDA चे कमिशनर SVR Srinivas यांनी ANI शी बोलताना दिलेल्या माहितीमध्ये पुढील काही महिन्यात काम पूर्ण होऊ शकत त्यामुळे मुंबईकरांच्या सेवेत मेट्रोच्या अजून दोन सेवा दाखल होण्याची शक्यता आहे असं म्हटलं आहे. दरम्यान काल श्रीनिवासन यांनी स्वतः कामाचा आढावा घेत अधिकार्‍यांकडून माहिती देखील घेतली आहे. नक्की वाचा:  Mumbai Metro Yellow Line 2A Trial उत्तम पद्धतीने पार पडली (Video).

दरम्यान, 'मी डेडलाईन बाबत कोणतीही घोषणा करू इच्छित नाही. आम्ही आधीच 2 वर्ष मागे आहोत. डिसेंबर 2019 मध्येच या लाईन सुरू होणं अपेक्षित होते पण अनेक कारणांमुळे हे लांबणीवर पडत आहे.' असे ते म्हणाले. 'पण आशा आहे की येत्या 3-4 महिन्यात त्या कार्यान्वित होतील. तर अजून दोन मार्गिका पुढील 6 महिन्यात सुरू करण्याचा विचार आहे. मुंबई मेट्रोच्या लाईन 7 वर अंधेरी ईस्ट ते दहिसर ईस्ट ही रेड लाईन आणि दहिसर वेस्ट ते डीएन नगर ही यलो लाईन यासाठी 2016 पासून काम सुरू आहे.

केवळ कोवीड आणि लॉकडाऊन हे मेट्रोचं लांबणीवर पडण्याला कारणीभूत नाहीत तर एन्ट्री आणि एक्झिट पॉईंटच्या येण्या-जाण्याला जागा उपलब्ध करणं, कामासाठी जागा उपलब्ध करून घेणे, तेथिल रहिवाशांना पर्यायी जागा देणं यासाठी देखील वेळ लागला. असे सांगण्यात आले आहे.

मेट्रो 7 हा मार्ग अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व असा एकूण 16.475 किलोमीटर लांबीचा आहे. या मेट्रो मार्गावर एकूण 13 मेट्रो स्टेशन आहेत. तर मेट्रो 2A हा मार्ग डी एन नगर अंधेरी ते दहिसर असा एकूण 18.589 किलोमीटर लांबीचा आहे. या मेट्रो मार्गावर एकूण 17 मेट्रो स्टेशन आहेत. या मेट्रो मुळे पश्चिम उपनगरामधील प्रवास वेगवान होणार आहे. मेट्रो मार्ग 2A आणि मेट्रो 7 मार्गासाठी चारकोप डेपोची हब म्हणून कामगिरी असणार आहे