Mumbai Metro 3: मुंबईकरांना दिलासा! सप्टेंबर महिन्यात करता येणार पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गावरून प्रवास; सुरु होप्णार SEEPZ-BKC विभाग
एमएमआरसीएलच्या ताफ्यात सध्या 19 रेक आहेत, जे कॉरिडॉरचा टप्पा 1 चालवण्यासाठी पुरेसे आहेत. भविष्यात, 260 सेवा दररोज अंदाजे 1.7 दशलक्ष प्रवाशांना सेवा पुरवतील.
Mumbai Metro 3: मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. सप्टेंबर महिन्यात मुंबईकरांना शहरातील पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गावरून प्रवास करता येणार आहे. ही लाईन बांधत असलेल्या, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (MMRCL) एमएमआरसीएल) सांगितले की, सिप्झ-बीकेसी-कुलाबा मेट्रो 3 मार्गाचा सिप्झ-बीकेसी विभाग सप्टेंबरमध्ये व्यावसायिक ऑपरेशनला सुरु करेल. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या 9.63 किमी लांबीच्या फेज 1 विभागात विद्यानगरी, मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस; शहरातील विमानतळ आणि बीकेसीचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय टर्मिनलसह दहा स्थानके आहेत.
नागरिकांच्या गट वॉचडॉग फाऊंडेशनचे अधिवक्ता गॉडफ्रे पिमेंटा यांनी, 22 ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्जाला 26 ऑगस्ट रोजी दिलेल्या उत्तरात ही माहिती करण्यात आली.
यासह बीकेसी आणि कफ परेड दरम्यानच्या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील व्यावसायिक कामकाज फेब्रुवारी, 2025 मध्ये सुरू होईल, असेही आरटीआय उत्तरात म्हटले आहे. एमएमआरसीएलच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण लाईनचे 97 टक्के काम पूर्ण झाले आहे. सिप्झ-कुलाबा मार्ग 33.5 किमीचा असून, आरे डिपोर्ट हे मार्गाच्या उत्तरेकडील पहिले स्थानक आहे.
एमएमआरसीएल स्थानकांच्या मल्टी-मॉडल इंटिग्रेशनवर देखील काम करत आहे, ज्यामध्ये शेवटच्या मैलापर्यंत सार्वजनिक वाहतुकीच्या इतर पद्धतींसह कनेक्टिव्हिटी, स्थानकाबाहेरील चांगले फूटपाथ, आसनव्यवस्था आणि आवश्यक तेथे फूट ओव्हर ब्रिज यांचा समावेश असेल. (हेही वाचा: Dangerous Bridges in Mumbai: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर BMC ने जारी केली मुंबईमधील 13 धोकादायक पुलांची यादी; मिरवणुकीवेळी काळजी घेण्याचा इशारा)
मेट्रो 3 वरील स्थानके:
फेज 1- वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), विद्यानगरी, सांताक्रूझ, देशांतर्गत विमानतळ टर्मिनल 1, सहार रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2, मरोळ नाका, एमआयडीसी, सिप्झ आणि आरे कॉलनी.
फेज 2- कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, विज्ञान संग्रहालय, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, शितलादेवी, धारावी.