Mumbai Metro: मुंबई मेट्रो साठी 159 झाडांवर पडणार कुऱ्हाड; पालिकेने दिला हिरवा कंदील
याबाबत एबीपी माझा वाहिनी च्या माहितीनुसार, मेट्रो 2 आणि 7 च्या कामासाठी 159 झाडे तोडण्याची मंजुरी वृक्ष प्राधिकरण समितीकडे मागण्यात आली होती
मुंबई मेट्रो (Mumbai Metro) व शासकीय बांधकामात अडथळा ठरणाऱ्या 159 झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार असून याला मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने संमती दिल्याचे वृत्त आहे. याबाबत एबीपी माझा वाहिनी च्या माहितीनुसार, मेट्रो 2 आणि 7 च्या कामासाठी 159 झाडे तोडण्याची मंजुरी वृक्ष प्राधिकरण समितीकडे मागण्यात आली होती. मागील काही काळात आरे कॉलनी (Aarey Colony) मधील वृक्षतोडीवरून पर्यावरण प्रेमींनी रान उठवले असता ही मंजुरी दिली जाते का आणि शिवसेना (Shivsena) किंवा सरकार एकूणच याबबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, मेट्रो साठी नव्हे तर मेट्रो स्थानकाच्या आसपास असणारे रस्ते आणि नाल्याच्या कामासाठी झाडांच्या तोडीला संमती देत आहोत असे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले आहे.
आरे सहित काही ठिकाणी वृक्षतोड झाल्यास त्याजागी मेट्रोची कामे वेगाने पूर्ण होण्यास मदत होईल तसेच या वृक्षाचे पुनर्रोपण अन्य ठिकाणी केळ्याने पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास होणार माही असा दावा भाजपकडून मागेल काळात करण्यात आला होता, मात्र वृक्षतोडीला पालिकेने ठाम नकार दिला होता. ज्यावर भाजप व अन्य सदस्यांनी मागणी लावून धरल्याने नंतर मंजुरी देण्यात आली होती.
दरम्यान,159 झाडे तोडताना त्या जागी अन्य ठिकाणी 107 झाडे पुनर्रोपित करण्याचे निर्देश सुद्धा पालिकेकडून देण्यात आले आहेत. यापूर्वी, अंधेरी पश्चिम डी.एन. नगर ते ओशिवरा नाला दरम्यान मेट्रो मार्ग 2-ए दरम्यानची 32 झाडांची कत्तल करण्यात येणार आहेत. मात्र येथे 90 झाडांचे पुर्नारोपण करण्यात येईल. गोरेगाव पश्चिम मेट्रो-2ए प्रकल्पासाठी गोरेगाव आणि बांगूरनगर दरम्यान 29 झाडे कापून त्या ठिकाणी 85 नवी झाडे लावण्यासाठीची परवानगी मागण्यात आली होती.