Mumbai Mega Block Update: प्रवाशांचे हाल! मध्य, हार्बरवर आज लोकल फेऱ्या 20 मिनिटे विलंबाने
माटुंगा-मुलुंड धीम्या मार्गावर आणि पनवेल-वाशी मार्गावर मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे.माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पुलाचे गर्डर उभारण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
माटुंगा-मुलुंड धीम्या मार्गावर आणि पनवेल-वाशी मार्गावर मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पुलाचे गर्डर उभारण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत अप-डाऊन धीमा मार्ग आणि अप-डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. परिणामी, रविवारी लोकलफेऱ्या सुमारे 20 मिनिट उशिराने धावणार आहेत. दरम्यान, धीम्या मार्गावरील लोकलफेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे विद्याविहार आणि कांजुरमार्ग स्थानकावर लोकल थांबणार नाहीत. यामुळे काही लोकलफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अधिक हाल होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, माहीम आणि वांद्रे स्थानकात रात्रकालीन ब्लॉक असल्याने रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. हे देखील वाचा-Mumbai Mega Block Update: माहीम-वांद्रे दरम्यान 2 दिवस आपत्कालीन ब्लॉक; जाणून घ्या लोकल वेळापत्रक
हार्बर रेल्वे-
हार्बर लाईनवर पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्ग सकाळी 11.30 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूर मार्गावरी अप डाऊन लोकल फेऱ्या बंद राहणार आहे. तसेच ठाणे ते बेलापूर/पनवेल मार्ग तसेच खारकोपर ते नेरूळ/बेलापूर मार्गावरील लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे / वाशी लोकल फेऱ्या सुरु राहणार आहेत.
मध्य रेल्वे-
मध्ये रेल्वेवर पूल पाडण्यासाठी शनिवारी आणि रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मुलुंड ते कळवा दरम्यान डाऊन मार्गावर मध्यरात्री 12 वाजून 15 मिनिटांपासून तर, पहाटे वाजून 15 पर्यंत या ठिकाणी मेगाब्लॉकचे काम सुरु राहणार आहे. शनिवार रात्री 11.10 नंतर सीएसएमटीतून सुटणाऱ्या सर्व लोकलफेऱ्या मुलुंड ते कळवादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. रात्री 11.30 नंतर कल्याणहून सीएसएमटीसाठी रवाना होणाऱ्या लोकल दिवा-मुलुंडदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.
मुंबईची लाईफलाईन असाणारी मुंबई लोकलाच्या माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान शुक्रवार-शनिवार आणि शनिवार-रविवार मध्यरात्री आपत्कालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांचे अधिक हाल होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.