Mumbai Mega Block Update: माहीम-वांद्रे दरम्यान 2 दिवस आपत्कालीन ब्लॉक; जाणून घ्या लोकल वेळापत्रक

माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पुलाचे गर्डर उभारण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री 12 ते पहाटे 5.30 दरम्यान अप-डाऊन धीमा मार्ग आणि अप-डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. याचा परिणाम लोकल फेऱ्यांवर होणार आहे. रात्री घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकमुळे 18 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Image For Representation (Photo Credits-Facebook)

Mumbai Mega Block Update: मुंबईची लाईफलाईन असाणारी मुंबई लोकलाच्या माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान शुक्रवार-शनिवार आणि शनिवार-रविवार मध्यरात्री आपत्कालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पुलाचे गर्डर उभारण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री 12 ते पहाटे 5.30 दरम्यान अप-डाऊन धीमा मार्ग आणि अप-डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. याचा परिणाम लोकल फेऱ्यांवर होणार आहे.

रात्री घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकमुळे 18 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तुम्हीही ब्लॉक काळात लोकलने प्रवास करणार असाल तर रद्द करण्यात आलेल्या लोकल गाड्यांचे वेळापत्रक नक्की पहा. (हेही वाचा - प्रवाशांना रेल्वे आरक्षण यादी आता ऑनलाईन पाहता येणार)

रद्द करण्यात आलेल्या लोकल फेऱ्या -

या व्यतिरिक्त महालक्ष्मी ते बोरिवली दरम्यानची 05.06 वाजताची लोकल फेरी रद्द करण्यात आली आहे. तसेच 05.20 वाजताची दादर ते विरार, 04.04 अंधेरी ते चर्चगेट, 04.13 वाजताची विरार ते दादर या लोकल रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकमुळे जलद मार्गावरून धावणाऱ्या लोकल गाड्या धीम्या गतीने धावणार आहेत. यात 04.05 भाईंदर -चर्चगेट, 03.53 विरार-चर्चगेट, 04.36 भाईंदर-चर्चगेट, 04.25 विरार-चर्चगेट या गाड्यांचा समावेश असणार आहे.