Mumbai Mega Block: मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या विशेष मेगाब्लॉक, जाणून घ्या या मार्गांवरील रविवारचे विशेष वेळापत्रक

उद्याचा रविवार म्हणजेच 21 जुलै ला मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावर विशेष मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील काही तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे.

Mumbai Mega Block: मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या विशेष मेगाब्लॉक, जाणून घ्या या मार्गांवरील रविवारचे विशेष वेळापत्रक
मुंबई लोकल | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

उद्याचा रविवार म्हणजेच 21 जुलै ला मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावर विशेष मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील काही तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. यात मध्य मार्गावरील मेगाब्लॉक सकाळी 11.15 मिनिटांनी सुरु होणार असून दुपारी 3.45 वाजेपर्यंत असणार आहे.मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते माटुंगा सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर, तर पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल. हार्बर मार्गावरील लोकल ब्लॉक दरम्यान रद्द करण्यात येतील.

मध्य मार्गावरील मेगाब्लॉक:

1. मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक दरम्यान कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे जाणाºया जलद मार्गावरील लोकल दिवा ते परळ स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. या वेळी लोकल सर्व स्थानकांवर थांबतील.

2. परळ स्थानकानंतर लोकल जलद मार्गावर चालविण्यात येतील.

3. सीएसएमटी येथून सकाळी 10.05 ते दुपारी 3.22 वाजेपर्यंत कल्याण दिशेकडे जाणा-या लोकल संबंधित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबतील.

पश्चिम मार्गावरील मेगाब्लॉक:

1. सीएसएमटीहून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.16 वाजेपर्यत वांद्रे/गोरेगाव दिशेकडे एकही लोकल धावणार नाही.

2. तसेच गोरेगाव/वांद्रेहून सकाळी 10.45ते दुपारी 4.58 वाजेपर्यंत सीएसएमटी दिशेकडे जाणा-या लोकल रद्द केल्या जातील.

3. पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल.

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक:

1. हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून चुनाभट्टी/वांद्रे दिशेकडे जाणा-या लोकल सकाळी 11.40 वाजल्यापासून ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत रद्द केल्या जातील.

2. सीएसएमटी/वडाळा रोडहून सकाळी 11.34 ते दुपारी 4.23 वाजेपर्यंत वाशी / बेलापूर / पनवेल या दिशेकडे तसेच सीएसएमटीहून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.16 वाजेपर्यत वांद्रे/गोरेगाव दिशेकडे एकही लोकल धावणार नाही.

3. हार्बर मार्गावरील माहिम स्थानकावर 21 जुलै रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार असून, यादरम्यान धारावी रोड उड्डाणपुलाचे काम केले जाईल.

हेही वाचा-  Mumbai Mega Block: मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या विशेष मेगाब्लॉक, जाणून घ्या या मार्गांवरील रविवारचे विशेष वेळापत्रक

या मेगाब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानकावरून पनवेल-कुर्ला विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक काळात सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना त्याच तिकीट किंवा पासवर पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची मुभा राहील.

(The above story first appeared on LatestLY on Jul 20, 2019 09:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).