Kishori Pednekar: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जीवे मारण्याची धमकी; आजाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी आजाद मैदान पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

Kishori Pednekar | (Photo Credits: ANI)

मुंबईच्या महापौर (Mumbai Mayor) किशोर पेडणेकर (Kishori Pednekar) यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आजाद मैदान पोलीस ठाण्यात (Azad Maidan police station) अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर या 22 डिसेंबर रोजी मुंबई महापालिका कार्यालयात असताना त्यांना हा फोन आला होता. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी आजाद मैदान पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. टीव्ही9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

किशोरी पेडणेकर यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले. परंतु, त्यांना 22 डिसेंबर रोजी हा फोन आला. मात्र, त्यांनी 31 डिसेंबरला इतक्या उशिरा का पोलिसांत तक्रार दाखल केली?  यासह अनेक चर्चांना उधाण आले आहेत. सध्या किशोरी पेडणेकर यांना धमकी देण्याऱ्या व्यक्तिचा शोध घेतला जात आहे. तसेच त्यांना धमकी देण्यामागे संबंधित व्यक्तिचा काय हेतू होता? याबाबतही चौकशी केली जात आहे. हे देखील वाचा- Mumbai COVID-19 Death Cases: मुंबईत कोरोना रुग्णांचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमी मृत्यूदर पाहून BMC आयुक्तांनी कोविड योद्धांसह जनतेचे केले अभिनंदन

किशोरी पेडणेकर या कट्टर शिवसैनिक आहेत. त्या नेहमी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात अग्रेसर असतात. परिचारिकेचे शिक्षण घेतलेल्या किशोरी यांची नगरसेविका पदाची ही तिसरी वेळ आहे. स्थायी समिती, महिला बाल कल्याण समिती, सुधार समिती या समित्यांवरील कामाचा त्यांना अनुभव आहे. विधानसभा निवणुकीच्या वेळी आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. निष्ठावान अशी ओळख असलेल्या किशोरी यांच्यावर मातोश्रीचाही विश्वास आहे. त्यामुळे महापौर पद महिला आरक्षित नसतानाही पुरुषांना डावलून किशोरी यांच्या नावाची घोषणा पक्षाने केली होती.