Malad Wall Collapse Incident: मालाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा 29; KEM रूग्णालयातील जखमीचा रूग्णालयात मृत्यू
यामध्ये आता केईएम रूग्णालयातील एकाचा मृत्यू झाल्याने आता मालाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 29 इतका झाला आहे.
मुंबईमध्ये आठवड्याभरापूर्वी 2 जुलैच्या रात्री झालेल्या पावसामुले सर्वत्र हाह:कार पसरला होता. मालाड पूर्व येथे पिंपरीपाडा परिसरात भिंत कोसळून काही जणांचा मृत्यू झाला होता तर जखमींना सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये आता केईएम रूग्णालयातील एकाचा मृत्यू झाल्याने आता मालाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 29 इतका झाला आहे.
मुंबईमध्ये पालिका प्रशासनाच्या जलाशयाची संरक्षक भिंत कोसळून मालाड मध्ये 2 जुलैच्या रात्री पिंपरीपाडा परिसरात राहणार्या लोकांवर अस्मानी संकट कोसळलं आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमींची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली.
ANI Tweet
मालाड येथील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना सरकारने 5 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.