मुंबई: महाराष्ट्र राज्य सडक विकास प्राधिकरणाकडून वांद्रे-वरळी सीलिंकवर फास्टॅग सुरु

MSDRC ने मुंबईमध्ये पाच प्रवेश मार्गांवर FASTag सेवा सुरु केली आहे. ज्यात वांद्रे वरळी सागरी सेतूचाही समावेश आहे. राज्य रस्ते विकास प्राधिकरणाने एमएसआरडीसी, पीडब्लूडी आणि एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या टोल संचालकांसोबत फास्टॅग सेवा सुरु करण्याबाबत एक बैठक घेतली होती.

An image of Bandra Worli Sea Link in Mumbai (Image Credit: Facebook/BWSL.Mumbai)

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण (Maharashtra State Road Development Corporation) अर्थातच एमएसआरडीसी कडून मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवर फास्टॅग (FASTag) सेवा आजपासून (शुक्रवार, 24 जानेवारी) सुरु करण्यात आली. या आधी शहरामध्ये फास्टॅग सेवा सुरु करण्यासाठी MSDRC कडून 15 जानेवारीपर्यंत समयसीमा वाढवून देण्यात आली होती. मीडिया रिपोर्टनुसार, त्यावेळी वाढती रहदारी आणि त्यातून निर्मण होणारी वाहतूक कोंडी याचा निपटारा करण्यासाठी सॉफ्टवेअर चाचणी करण्यासाठी ही समयसीमा वाढवून देण्यात आली होती. प्राप्त माहितीनुसार सुमारे 50,000 वाहने वाद्रे-वरळी सागरी सेतूवरुन मार्गक्रमण करतात.

MSDRC ने मुंबईमध्ये पाच प्रवेश मार्गांवर FASTag सेवा सुरु केली आहे. ज्यात वांद्रे वरळी सागरी सेतूचाही समावेश आहे. राज्य रस्ते विकास प्राधिकरणाने एमएसआरडीसी, पीडब्लूडी आणि एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या टोल संचालकांसोबत फास्टॅग सेवा सुरु करण्याबाबत एक बैठक घेतली होती. या बैठकीत या सेवेबाबत आढावा घेण्यात आला.एमएसआरडीसी 40 टोल नाक्यांवर निगराणी ठेवते. ज्यातील 23 टोल नाके राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली चालवले जातात. (हेही वाचा, सावधान! आधार, पॅन क्रमांक नाही दिला तर, कंपनी आपला पगार कापू शकते, आयकर विभागाचा नवा नियम)

ट्विट

दरम्यान, 1 डिसेंबर 2019 पासून राष्ट्रीय मार्गांवरील टोल नाक्यांवरही फास्टॅग सेवा बंधनकारक करण्यात आली होती. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार फास्टॅग सेवा लागू झाल्यापासून टोल नाक्यावर वाहनांचा निपटारा होण्याचे प्रमाण सुमारे 29 टक्क्यांनी वाढले आहे. केंद्रीय टोल नाका निरिक्षण प्रणालीनुसार, 15 नोव्हेंबर 2019 आणि 14 डिसेंबर 2019 या काळात टोल नाक्यांवर टोल भरण्यासाठी वाट पाहण्याचा कालावधी सरासरी 7 मिनिट 44 सेकंद इतका होता. जो यापूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now