खुशखबर! मुंबई लोकल चे पर्यटक तिकीट घेऊन, तिन्ही लाईन्सवर हवा तेव्हा प्रवास करता येणार

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गावरून धावणाऱ्या लोकल ट्रेनमधून (Mumbai Local Trains)  दररोज लाखो चाकरमानी प्रवास करतात. मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी ही ट्रेन म्हणजे काहींसाठी तर दुसरं घरच म्हणता येईल. येत्या काही दिवसात या लोकल प्रवाश्यांसाठी एक खुशखबर घेऊन येत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून दिली आहे. ज्यानुसार यापुढे प्रवाश्यांनी एक पर्यटक तिकीट (Tourist Ticket)  काढल्यास त्यांना लोकलच्या तिन्ही मार्गावरून केव्हाही आणि कितीही प्रवास (Unlimited Travel) करता येऊ शकणार आहे. तूर्तास या तिकिटाची वैधता 1 ते  5 दिवसांपर्यंत मर्यादित असणार आहे त्यासाठी वेगवेगळे शुल्क आकारण्यात येतील.

पश्चिम रेल्वे ने केलेल्या ट्विटमध्ये वेगवेगळ्या वैधतेच्या तिकिटांचे दार देखील नमूद करण्यात आले आहेत. ज्यानुसार, सध्या द्वितीय श्रेणी च्या डब्ब्यात प्रवास करण्यासाठी एका दिवसाचे 75 रुपये, तीन दिवसाचे 115 रुपये तर पाच दिवसाच्या तिकिटाचे 135 रुपये प्रवाश्यांना मोजावे लागतील. तसेच प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करायचा झाल्यास एका दिवसाचे 255  रुपये, तीन दिवसाचे 415 रुपये तर पाच दिवसांचे केवळ 485 रुपये भरून तुम्ही या सवलतीचा लाभ घेऊ शकता. मुंबईकर रेल्वे प्रवाशांना 2019 पर्यंत Mumbai Local मध्ये Free WiFi मिळण्याची शक्यता

 

पश्चिम रेल्वे ट्विट

पर्यटक प्रवासी तिकीटाची खरेदी करूंन कमी किंवा अजिबात वापर जरी केला नसला तरी तिकीटाची रक्कम परत केली जाणार नाही, मात्र या तिकिटासाठी केलेले पूर्व बुकिंग वैधता लागू व्हायच्या एक दिवस आधीपर्यंत रद्द करता येऊ शकते, यानुसार प्रथम श्रेणीचे तिकीट रद्द करायचे झाल्यास 30 रुपये तर द्वितीय श्रेणीच्या तिकिटासाठी 15 रुपये किंमत आकारली जाईल.

याचप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यात ट्रेच्या समस्यांवर उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने नाले सफाई व रुळांची दुरुस्तीचा प्रकल्प अलीकडे हाती घेतला आहे Western Railways: 'पश्चिम रेल्वे' ची मान्सूनपूर्व तयारी, ड्रोन मार्फत सर्वेक्षण आणि नालेसफाईला सुरवात काही दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेने महिला प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी देखील काही पावलं उचलली होती. ज्यांतर्गत तब्बल 72 लोकल गाड्यांमध्ये टॉक बॅक सिस्टीम सुरु करण्यात आली आहे या सिस्टीमचा वापर करून महिला प्रवाशी संकटाच्या काळात मोटरमन किंवा रेल्वे गार्डशी संवाद साधू शकतात.