Mumbai Woman Loses Legs in Train Accident: लोकल पकडण्याच्या प्रयत्नात पुन्हा एक अपघात; महिला पाय घसरुन पडली अन् अंगावरुन ट्रेन गेली, दोन्ही पाय गमावले

बेलापूर स्थानकात ही घटना घडली.

Photo Credit - X

Mumbai Woman Loses Legs in Train Accident: मुंबई आणि आजूबाजूच्या भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. याचा परिणाम म्हणून मध्य रेल्वेची लोकल सेवा आणि ट्रान्स हार्बर लोकल सेवा उशिराने होत होती. त्यामुळे सर्वच स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दीही झाली होती. दरम्यान, नवी मुंबईतल्या बेलापूर स्थानकात (Belapur Station)एका महिलेला लोकल पकडण्याच्या प्रयत्नात पाय गमवावे लागले आहेत. लोकल पकडत असताना एक महिला रुळावरुन खाली पडली आणि तिच्या अंगावरुन ट्रेन गेली. या घटनेत तिला दोन्ही पाय गमवावे लागले (Woman Loses Her Legs)आहेत. (हेही वाचा:Mumbai Rains: मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरील वाहतूक तासभर ठप्प; 50 उड्डाणे रद्द, 27 मार्ग बदलले )

रात्रभर मुंबईसह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. कुर्ला, चुनाभट्टी, सायन परिसरात पावसाचं पाणी रेल्वे ट्रॅकवर साचलं होतं. बेलापूरहून ठाण्याला जाणारी लोकल आल्याने प्रवाशांची गर्दी झाली होती. या गर्दीतच महिलेचा पाय घसरला आणि तिच्या अंगावरुन रेल्वेचा पहिला डबा गेला. ज्यात या महिलेला तिचे पाय गमवावे लागले.

नेमकं काय घडलं?

पनवेलहून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी 9.30 च्या सुमारास सीबीडी बेलापूर या स्थानकात येत होती. त्यावेळी एक महिला पाय घसरुन रुळावर पडली. तिच्या अंगावरुन रेल्वेचा पहिला डबा गेला. या घटनेमुळे तेथे तारांबळ झाली. रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने काही वेळातच ट्रेन मागे घेतली. दोन पोलिसांनी तातडीने उडी मारुन तिला बाहेर काढलं. या महिलेला जेव्हा बाहेर काढलं तेव्हा तिचे पाय रक्काळलेले होते. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडीओ काढला.