Mumbai Local Megablock: उद्या मुंबईत तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या कुठे आणि कसा असेल ब्लॉक

यामुळे मुबई आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर पडण्यापुर्वी मेगाब्लॉकचे टाईमटेबल पाहूनच घरातून बाहेर पडा.

Mumbai Local | (File Image)

उद्या रविवारी मुंबई लोकलच्या (Mumbai Local) दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मुबई (Mumbai) आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर पडण्यापुर्वी मेगाब्लॉकचे टाईमटेबल पाहूनच घरातून बाहेर पडा. ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर, कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर आणि पश्चिम मार्गावर रात्रकालीन ब्ल़क असणार आहे.  (हेही वाचा - Pune Local Megablock: पुणे ते लोणावळा लोकल दरम्यान मेगाब्लॉक, काही लोकल रद्द तर काही एक्सप्रेस गाड्या कॅन्सल)

ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 09.30 ते दुपारी 2.45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध-जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणार्‍या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.



संबंधित बातम्या