Mumbai Local Megablock 2nd February 2020: मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक, पहा वेळापत्रक
तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी तिनही रेल्वेमार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे
मुंबईत प्रत्येक रविवारी रेल्वेच्या मेगाब्लॉक मुळे (Megablock) मुंबईकरांना उशिराने धावणाऱ्या लोकलचा त्रास सहन करावा लागतो. उद्या म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी सुद्धा मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर म्हणजेच मध्य, पश्चिम आहि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी तिनही रेल्वेमार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. यात मध्य मार्गावरील मेगाब्लॉक सकाळी 11.15 मिनिटांनी सुरु होणार असून दुपारी 3.45 वाजेपर्यंत असणार आहे.मध्य रेल्वे मार्गावरील भायखळा ते विद्याविहार मार्गावर होणार आहे, तर पश्चिम मार्गावरील वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असेल. हार्बर मार्गावरील लोकल ब्लॉक दरम्यान रद्द करण्यात येणार आहेत.
ब्लॉकमुळे प्रवाशांना रेल्वेची वाट पाहावी लागणार आहे, त्यामुळे खोळंबा वाचवण्यासाठी वेळापत्रक पाहून त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे असे रेल्वे तर्फे सांगण्यात आले आहे. मुंबई: मध्य रेल्वेवरील AC Local चा पहिल्याच दिवशी खोळंबा; 25 मिनिटं उशिराने आल्याने नेरूळ स्थानकांत तोबा गर्दी (Watch Video)
मध्य रेल्वे
भायखळा-विद्याविहार मार्गावर सकाळी 11.15 वाजल्यापासून दुपारी 3.45 वाजे पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यावेळेत भायखळा येथून पुढे धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल परेल, दादर, माटुंगा, कुर्ला येथे थांबतील मात्र चिंचपोकळी, करीरोड येथे ट्रेनची सेवा बंद असेल.
हार्बर रेल्वे
कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 वाजल्या पासून ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे, ब्लॉक काळात सीएसएमटी- वाशी/ पनवेल/ बेलापूर अशा सर्व लोकल रद्द असणार आहेत. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी काही विशेष गाड्या सुरु असतील, तसेच समान तिकीट आणि पासवर प्रवाशांना मेन लाईन आणि ट्रान्स हार्बर वरून प्रवास करता येणार आहे.
पहा ट्विट
पश्चिम रेल्वे
वसई रोड ते भाईंदर दरम्यान अप आणि डाऊन धीम्या रेल्वे मार्गावर उद्या सकाळी 11 पासून ते दुपारी 3 पर्यंत ब्लॉक घेतला जाईल. या वेळेत धीम्या मार्गावरील वाहतूक ही जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.
दरम्यान, उद्या ब्लॉक कालावधीत काही लोकलच्या फेऱ्या रद्द राहतील तर अन्य लोकल या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत, यामुळे नेहेमीपेक्षा किंचित अधिक गर्दी पाहायला मिळू शकते.