Mumbai Hit And Run: मुंबई येथील वरळी परिसरात 'हिट अँड रन'; एक ठार, दुसरा जखमी; वाहनचालक फरार

या प्रकरणाची चर्चा आणि तपास अद्यापही कायम असताना अशाच एका घटनेने मुंबई (Mumbai) शहर हादरुन गेले. वरळी येथे हिट अँड रन (Heat And Run) अपघाताची घटना घडली आहे. बाजारात मासळी आणण्यासाठी गेलेल्या एका दाम्पत्याला एका चारचाकी अज्ञात वहानाने धडक दिली.

Hit And Run | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Worli Hit And Run Accident: पुणे आणि नागपूर येथील अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी महाराष्ट्र हादरवून टाकला. या प्रकरणाची चर्चा आणि तपास अद्यापही कायम असताना अशाच एका घटनेने मुंबई (Mumbai) शहर हादरुन गेले. वरळी येथे हिट अँड रन (Hit And Run) अपघाताची घटना घडली आहे. बाजारात मासळी आणण्यासाठी गेलेल्या एका दाम्पत्याला एका चारचाकी अज्ञात वहानाने धडक दिली. ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे तर तिच्यासोबत असलेला पुरुष गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (7 जुलै) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. धक्कादायक म्हणजे वाहन चालकाने आपल्या वाहनासह घटनास्थळावरुन पलायन केले. पोलीस फरार चालक आणि त्याच्या वाहनाचा शोध घेत आहेत.

अ‍ॅट्रिया मॅाल परिसरातील घटना

वरळी येथील प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅट्रिया मॅाल परिसरात हिट अँड रनची ही घटना घडली. वरळी येथील कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा हे कोळी पती-पत्नी दाम्पत्य पूर्वीपासून मासळीचा व्यवसाय करते. नेहमीप्रमाणे मासळी आणण्यासाठी हे दाम्पत्य पहाटेच्या वेळी घराबाहेर पडले होते. मासळी घेऊन परत येताना आणि मासळी लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी दुचाकीवरुन निघाले असता चारकाकी वाहनाने त्यांना धडक दिली आणि हा अपघात घडला. या दाम्पत्याकडे दुचाकीवर बरेच सामान आणि मासे असल्यामुळे दुचाकीला धडक बसताच दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि दोघेही चारचाकीच्या बोनेटवर आदळले. बोनेटवर आदळलेल्या पतीने प्रसंगावधान दाखवत मोठ्या शताफीने बाजूला उडी घेतली. मात्र, महिलेला ही चलाकी करुन बाजूला होता आले नाही. परिणामी तिला गंभीर मार लागला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Pune Hit And Run Accident: पुणे जिल्ह्यात पुन्हा 'हिट अँड रन'; पिंपरी चिंचवड परिसरातील हिंजवडी येथे भरधाव कारने तरुणीला चिरडले (Watch Video))

रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू

अपघातामुळे चारचाकी चालक भांबावला आणि त्याने आपले वाहन अधिकच वेगाने हाकले. परिणामी महिलाही या वहनाच्या बोनेटसोबत फरफटत गेली. अपघातात महिलेलोबतचा पुरुष बचावला पण महिला गंभीर जखमी झाली. तिला जवळच्याच मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आलं. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी तिला उपचारांपूर्वीच मृत घोषीत केले. दरम्यान, या घटनेत वाहनचालक वाहनासह पळून गेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (हेही वाचा, Hit-and-Run in Nagpur: हिट अँड रन प्रकरणाची नागपूर शहरात पुनरावृत्ती; दोन ठार, पाच जखमी; भरधाव कारने 8 मजूरांना चिरडले, चालकास अटक)

दरम्यान, पुणे येथेही अशाच प्रकारची घटना घडली होती. एका अल्पवयीन मुलाने पोर्श ही अत्यंत महागडी आणि अलिशान गाडी भरधाव वेगाने हाकत पुण्यातील कल्याणीनगर परिसरात दोघांना चिरडले होते. ज्यामध्ये एक मुलगी आणि मुलगा यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलगा त्याचे वडील आणि अजोबा यांना अटक करण्यात आली. हे प्रकरण प्रसारमाध्यमे, राजकीय वर्तुळ आणि विधिमंडळ अधिवेशनातही जोरदार गाजले. नागपूर येथेही अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यामुळे पाठिमागच्या एकदोन महिन्यांमध्ये हिट अँड रनच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे पुढे आले आहे.