कुख्यात गुंड अरुण गवळी पुन्हा एकदा तुरुंगाबाहेर; फरलोवर मिळाली 28 दिवसांची रजा

परंतु यावर सुनावणी झाली नव्हती.

Arun Gawli (Photo credits: Facebook)

मुंबईचा कुख्यात गँगस्टर अरुण गवळी (Arun Gawli) यांना पुन्हा एकदा तुरुंगातून फरलोवर 28 दिवसांच्या रजेवर घरी सोडण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा फरलो मंजूर केला आहे. अलीकडेच अरुण गवळी याच्या मुलीचे लग्न झाले. त्यावेळी त्याला आधीच दिलेल्या 45 दिवसांच्या पॅरोलमध्ये वाढ करण्यात आली होती. आपल्या आजारी पत्नीच्या सेवेसाठी त्याला 45 दिवसांचा पॅरोल मिळाला होता. असे सांगण्यात येत आहे की, सध्या मिळालेल्या 28 दिवसांच्या पॅरोलसाठी त्याने 30 नोव्हेंबर 2019 मध्ये तुरुंग प्रशासनाकडे अर्ज केला होता. परंतु यावर सुनावणी झाली नव्हती.

त्यामुळे ही सुनावणी मंगळवारी म्हणजेच 7 जुलै ला पार पडली आणि त्याला फरलोवर 28 दिवसांची रजा मिळाली. या आधी त्यांना 8 वेळा पॅरोलवर तुरुंगातून सोडण्यात आले आहे.

हेदेखील वाचा- अरुण गवळीची कन्या योगिता गवळी व अभिनेता अक्षय वाघमारे अडकले विवाह बंधनात; लॉक डाऊनमध्येही थाटामाटात साजरा झाला सोहळा (See Photos)

याआधी अरुण गवळी पत्नीच्या आजारपणासाठी 45 दिवसांसाठी पॅरोलवर नागपूर तुरुंगाबाहेर सोडण्यात आले होते. एप्रिल महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 27 एप्रिलला त्याने कारागृहात हजर होणं अपेक्षित होतं. पण याचवेळी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला. त्यामुळे अरुण गवळीने अर्ज करत पॅरोल वाढवण्याची मागणी केली होती. यावेळी न्यायालयाने अर्ज स्वीकारत 10 मे पर्यंत अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये वाढ केली होती. यानंतरही अरुण गवळीला वाढ देत 24 मे पर्यंत पॅरोल देण्यात आला होता. दरम्यान पॅरोलवर बाहेर असताना अरुण गवळीची योगिताचा विवाहसोहळा पार पडला.

मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीत मोठ्या थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाला अगदी मोजकेच लोक उपस्थित होते, यामध्ये मुख्यत्वे कुटुंब नी जवळच्या मित्रांचा समावेश होता.