मुंबई: चेंंबुर नाका परिसरात झोपडपट्टीला आग; जीवितहानी नाही (Watch Video)
सिद्धार्थ कॉलनीजवळ संंध्याकाळी 8.30 च्या सुमारास ही आग लागली असून या आगीमध्ये सुदैवाने कोणतीच जीवितहानी झालेली नाही.
चेंबूर नाका (Chembur Naka) परिसरातील गणेशनगर (Ganesh Nagar) झोपडपट्टीमध्ये आज (26मार्च) आग भडकली आहे. सिद्धार्थ कॉलनीजवळ संंध्याकाळी 8.30 च्या सुमारास ही आग लागली असून या आगीमध्ये सुदैवाने कोणतीच जीवितहानी झालेली नाही. झोपडपट्टीला लागलेल्या आगीचं कारण समजू शकले नसले तरीही आगीत काही सिलेंडर्सचे स्फोट झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हीआग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे.
पहा व्हिडिओ:
घटनास्थळी चेंबुर पोलिस आणि चार अग्निशमन दलाच्या गाड्या, वॉर्ड ऑफिसर्स आणि रूग्णवाहिका पोहचली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आग लागलेला परिसर मोकळा ठेवण्यात आला असून ट्राफिक वळवण्यात आलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Fire Safety Guidelines: मुंबईत वाढत्या उष्णतेच्या लाटेदरम्यान BMC ने जारी केली अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे; नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement