Mumbai Fire: अंधेरी MIDC मध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
अंधेरी (Andheri) MIDC परिसरातील रोळता टेक्नॉलॉजी पार्क (Rolta Technology Park) येथे आज 13 फेब्रुवारी रोजी दुपारी भीषण आग (Fire) लागल्याचे समजत आहे
अंधेरी (Andheri) MIDC परिसरातील रॉल्टा टेक्नॉलॉजी पार्क (Rolta Technology Park) येथे आज 13 फेब्रुवारी रोजी दुपारी भीषण आग (Fire) लागल्याचे समजत आहे. याठिकाणी सध्या अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) आठ गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगिचे नेमके कारण अद्याप समजु शकलेले नाही. मात्र आगीचे स्वरुप मोठे असुन यामुळे एमआयडीसी परिसरात धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. मुंबई: कांदिवली येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; 9 जण जखमी
प्राप्त माहितीनुसार, रॉल्टा कंपनीला लागलेली आग ही तिसऱ्या स्तरावरील आहे, या बिल्डिंग मध्ये सध्या काही लोक अडकल्याची शक्यता असून त्यांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाकडून बचावकार्य आरंभण्यात आले आहे.
ANI ट्विट
दरम्यान, मुंबईत आग लागण्याचे अनेक प्रकार गेल्या काही महिन्यांत पाहायला मिळाले आहेत. काही दिवसांपुर्वी नवी मुंबईतील हाय राईस अपार्टमेंटला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. काहीच दिवसांपूर्वी कुर्ला येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली होती, यात आसपासच्या रहिवाशी चाळींचा मोठा भाग जाळून खाक झाला होता, तर त्या पाठोपाठच दोन दिवसांपूर्वी चिंचपोकळी येथे अभ्युदयनगर परिसरात एका गोदामाला आग लागली होती.