मुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई! 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात

सायन हॉस्पिटलजवळ सिग्नलवर पाहणी करत असताना, लाल रंगाच्या रेनॉल्ट डस्टर गाडीमध्ये 11लाखाहून अधिक रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Unaccounted Cash in Sion (Photo Credits: Twitter)

मुंबईसह भारतामध्ये सध्या लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections) च्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. 10 मार्चला जेव्हा लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या तेव्हापासूनच आचारसंहिता (Code Of Conduct) सुरू करण्यात आली. दरम्यान देशात 19 मे पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे मात्र या काळात अघटीत किंवा गैर प्रकार घडू नये म्हणून निवडणूक आयोगाची भरारी पथकं (Election Commission Flying Squad) काम करत आहे. बुधवारी (17 एप्रिल) रात्री सायन परिसरात भरारी पथकाने सुमारे 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात घेतली आहे.

ANI ट्विट 

लोकसत्ताशी बोलताना मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायन हॉस्पिटलजवळ सिग्नलवर पाहणी करत असताना, लाल रंगाच्या रेनॉल्ट डस्टर गाडीमध्ये 11लाखाहून अधिक रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

दयाराम हरीराम जैस्वाल, अजितकुमार बलराज शाह व अनुराग कुमार शाह या तीन व्यक्तींकडे ही रक्कम सापडली असून त्यांची चौकशी आयकर विभागाचे उप आयुक्त करणार आहेत.