IPL Auction 2025 Live

Mumbai: 16 वर्षीय दिव्यांग मुलीवर उपचाराच्या नावाखाली वर्षभर बलात्कार; आरोपी डॉक्टर अटकेत

मुंबईतील एका 40 वर्षीय फिजिओथेरपिस्टला 16 वर्षीय शारीरिकदृष्ट्या अपंग मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली आहे.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मुंबईतील (Mumbai) एका 40 वर्षीय फिजिओथेरपिस्टला (Physiotherapist) 16 वर्षीय दिव्यांग (Physically Challenged) मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली सांताक्रूझ पोलिसांनी (Santacruz Police) अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आरोपी डॉक्टर एक वर्षाहून अधिक काळ मुलीवर उपचार करत होता. पीडित मुलगी उपचारासाठी जेव्हा डॉक्टरच्या क्लिनिकला भेट देत असे त्यावेळी आरोपी डॉक्टर तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

मंगळवारी जेव्हा मुलीने तिच्या मोबाईल फोनवरून तिच्या आई -वडिलांना टेक्स्ट मेसेज पाठवून या प्रकाराबद्दल माहिती दिली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. तिच्या हादरलेल्या पालकांनी गुरुवारी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि मुलीनेही घटनेचा तपशील पोलिसांना सांगितला, असे अधिकाऱ्याने सांगितले. (Thane Gangrape: ठाण्यात 26 वर्षीय मुलीवर 4 जणांकडून सामुहिक बलात्कार; कासारवडवली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल)

आरोपी डॉक्टर  मुलगी क्लिनिक आल्यानंतर बलात्कार करत असे, हे तपसादरम्यान पोलिसांच्या निर्दशनास आले. मुलीचे पालक नेहमी फिजिओथेरपिस्टच्या केबिनबाहेर बसायचे आणि म्हणूनच त्यांना या गुन्ह्याची माहिती नव्हती. आरोपींनी इतर मुलांवरही असेच गुन्हे केल्याचा संशय आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला त्याच्या क्लिनिकमधून पकडले आणि त्याच्याविरुद्ध कलम 376 आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या तरतुदींसह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला नंतर स्थानिक न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.