Shiv Sena:  सगळ्यांनाच 'दिघे' होता येत नाही, कारण काही जण 'शिंदे' होतात- दैनिक सामना

शिवसेना (Shiv Sena) पक्षात झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर शिवसेना खरी कुणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान, शिवसेना पक्षाची पारंपरीक ओळख आणि आकर्षण असलेल्या दसरा मेळाव्याबद्दलही उत्सुकता आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट अनुक्रमे शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदान येथे मेळावा घेत आहेत.

Shiv Sena | (File Photo)

शिवसेना (Shiv Sena) पक्षात झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर शिवसेना खरी कुणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान, शिवसेना पक्षाची पारंपरीक ओळख आणि आकर्षण असलेल्या दसरा मेळाव्याबद्दलही उत्सुकता आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट अनुक्रमे शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदान येथे मेळावा घेत आहेत. दरम्यान, शिवसेना मुखपत्र दैनिक सामनामधील (Dainik Saamna) ‘रोखठोक’ (Rokhthok) या सदरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. एकनाथ शिंदे हे दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाचा गैरवापर करत असल्याचा आरोप ‘रोखठोक’च्या माध्यमातून करण्यात आला आहे.

सामनातील 'रोखठोक'मधील महत्त्वाचे मुद्दे

  • शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे कवित्व सुरू आहे. शिवतीर्थावरचा मेळावाच खरा हे देश जाणतो. पण शिंदे गट त्यांचीच शिवसेना खरी असे मानून दुसरा मेळावा घेत आहे. या क्षणी दिल्लीस आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. पुन्हा आनंद दिघे यांच्या नावाने हे खेळ सुरू आहेत. राजकारणात सगळ्यांनाच ‘दिघे’ होता येत नाही. काही जण ‘शिंदे’ होतात.
  • सण-उत्सवांच्या मोसमात महाराष्ट्राचे वातावरण आणि राजकारण कमालीचे गढूळ झाले आहे. शिवसेनेत मोठी फूट पाडून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इथपर्यंत ठीक, पण त्यांनी सरळ शिवसेनेवरच दावा सांगितला. हे डोके शिंदे यांचे नाही. त्यामागे भारतीय जनता पक्षाचे मोठे कारस्थान आहे. छगन भुजबळ, नारायण राणे व राज ठाकरे यांनी बंड केले किंवा पक्ष सोडला. पण शिवसेनेवरच दावा सांगण्याचा उद्दामपणा यापैकी कोणीच केला नव्हता. हा उद्दामपणा भाजपच्या पाठिंब्यातून निर्माण झाला.
  • महाराष्ट्रात उभी फूट पाडण्यासाठी शिंदे यांनी आज हयात नसलेल्या स्व. आनंद दिघे यांचा आधार घेतला. दिघे यांची आठवण शिंदे यांना 21 वर्षांनंतर झाली. दिघे यांच्या आपण किती निकट होतो हे दाखविण्यासाठी शिंदे यांनी काही कोटी खर्च करून ‘धर्मवीर’ सिनेमा काढला. सिनेमावर खर्च झाला त्यापेक्षा जास्त खर्च सिनेमाच्या म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीवर केला. हा सिनेमा आनंद दिघे यांच्यावर होता की शिंद्यांवर, असा प्रश्न हा सिनेमा पाहून अनेकांना पडला. कारण या सिनेमाचे प्रयोग सुरू असतानाच शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या पाठीत खंजीर खुपसला व शिवसेना फोडली. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून टीव्हीवर या सिनेमाचा भडीमार सुरू आहे, तो फक्त शिंदे यांच्या प्रसिद्धीसाठी. या चित्रपटाद्वारे दिघे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हेच एक अद्भुत व्यक्तिमत्त्व असल्याचे दाखविण्यात आले आहे.
  • एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी केल्याने शिवसेना मूळ विचारापासून दूर गेली. बाळासाहेब ठाकरे किंवा आनंद दिघे यांना हे मान्य झाले नसते अशी थाप हे लोक मारत आहेत. मुळात शिवसेनेचे एक अष्टप्रधान मंडळ होते. शिवसेनाप्रमुख या अष्टप्रधान मंडळाशी चर्चा करून निर्णय घेत असत. या अष्टप्रधान मंडळात व निर्णय प्रक्रियेत आनंद दिघे नव्हते. ठाण्यातील सतीश प्रधान हे नेते म्हणून त्या अष्टप्रधान मंडळात होते. त्यावेळी व नंतरही दिघे यांचे प्रभाव क्षेत्र ठाणे जिल्ह्याच्या बाहेर नव्हते, पण आनंद दिघे यांच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ राज्यात तेव्हा अनेकांना पडली होती. त्याग, निःस्वार्थी भावना व शिवसेनेवरील अढळ श्रद्धा ही त्यांची राज्यात ओळख होती. त्यांच्या टेंभी नाक्यावरील कार्यपद्धतीवर अनेकदा छापून आले, पण दिघे हे काँग्रेसविरोधक आणि भाजपभक्त ही त्यांची प्रतिमा आज निर्माण केली जातेय ती चुकीची आहे.

एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा शिवसेनेतील सामना आता न्यायालयाच्या दारात जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना खरी कोणाची हे न्यायालय आणि निवडणूक आयोगच ठरवणार आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय काय येतो याबाबतही उत्सुकता आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now