BEST STRIKE : तोडगा नाही, चौथ्या दिवशीही बेस्ट वाहतूक कर्मचारी संप कायम; इलेक्ट्रीक युनियनचाही संपाला पाठिंबा
या संपावर वेळीच तोडगा निघाला नाही तर, मुंबईकरांच्या अडचणींची जागा हाल या शब्दात व्यक्त करण्यासारखी स्थिती निर्माण होऊ शकते. बेस्टच्या बसेस सुरु नसल्याने मुंबईची वाहिणी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनवर अधिक ताण पडतो आहे. तर, बेस्टचा संप म्हणजे आपल्याला कमाई करण्याची संधी असे सूत्र मानत काही रिक्षावाले प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत आहेत.
BEST strike enters Day 4: बेस्ट (BEST) वाहतूक विभाग कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज (शुक्रवार, 11 जानेवारी) चौथा दिवस आहे. गेल्या दशकभरातील सर्वाधिक काळ चाललेला संप म्हणून आता या संपाकडे पाहिले जाऊ लागले आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आणि सरकारची भूमिका यात समेट होत नसल्याने सध्यातही संप मिटण्याची कोणतीह चिन्हे दिसत नाहीत. आपल्या विविध मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाला आता इलेक्ट्रीक युनियनचाही पाठिंबा मिळाल्याचे वृत्त असून, इलेक्ट्रीक युनियनचे (Best Electric Union) सुमारे 600 कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचे समजते.
काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
- बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करावी.
- 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,390 रु. सुरु होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती करण्यात यावी.
- एप्रिल 16 पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू कराव्यात.
- 2016-17आणि 17-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा.
- कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढण्यात यावा.
- अनुकंपा भरती तातडीनं सुरु करावी
(हेही वाचा, BEST Employees Strike : बेस्ट संपातील कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत घर खाली करण्याची नोटीस)
या संपावर वेळीच तोडगा निघाला नाही तर, मुंबईकरांच्या अडचणींची जागा हाल या शब्दात व्यक्त करण्यासारखी स्थिती निर्माण होऊ शकते. बेस्टच्या बसेस सुरु नसल्याने मुंबईची वाहिणी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनवर अधिक ताण पडतो आहे. तर, बेस्टचा संप म्हणजे आपल्याला कमाई करण्याची संधी असे सूत्र मानत काही रिक्षावाले प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत आहेत. यात टॅक्सीवाल्यांचाही समावेश आहे. त्यामुळे मुंबईकरांची अधिकच कोंडी होत आहे. सकाळी कामावर जाताना आणि संध्याकाळी घरी परतताना त्यांना मोठी पायपीट करावी लागत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2019 08:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

