Mumbai Coastal Road Closure: मुंबई मध्ये कोस्टल रोड 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान DG Electric Work कामासाठी बंद राहणार

मुंबई कोस्टल रोड च्या कामासाठी 14,000 कोटी खर्च आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 किमी रोडचं 91% काम पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे. कोस्टल रोडचं उर्वरित काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे.

Mumbai Coastal Road Closure: मुंबई मध्ये कोस्टल रोड 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान DG Electric Work कामासाठी बंद राहणार
Costal Road | A screengrab of the video. (Photo credits: X/@mybmc)

मुंबई कोस्टल रोड अर्थात धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज रोड ट्राफिक साठी 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान बंद राहणार आहे. DG electric work साठी हा पूल बंद राहणार आहे. मुंबई ट्राफिक पोलिसांच्या माहितीनुसार, साऊथबाऊंड बोगदा 31 ऑगस्टच्या रात्री 9 वाजल्यापासून 2 सप्टेंबरला सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. पोलिसांनी नोटीफिकेशन मध्ये दिलेल्या माहितीमध्ये two DG sets च्या टेस्टिंगसाठी हे रस्ते बंद ठेवले जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे. कोस्टल रोड वरून वाहतूक करणार्‍यांना Amarsons Garden मधून बाहेर पडून Mukesh Chowk आणि NS Patkar Road चा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई ट्राफिक विभागाचं आवाहन

मुंबई कोस्टल रोड अपडेट्स

मुंबई कोस्टल रोडच्या साऊथबाऊंड सेक्शन मध्ये वरळी ते मरीन ड्राईव्ह हा 11 मार्चला सुरू करण्यात आला होता. ऑक्टोबर 2018 मध्ये प्रोजेक्ट सुरू करण्यात आला होता. हा पूल चार वर्षात बांधून पूर्ण होणार होता पण अजूनही त्याचे काम सुरू आहे. आता या पूलावरील रोड फेझ मध्ये सुरू होणार आहेत. जून मध्ये कोस्तल रोडचा दुसरा बोगदा सुरू करण्यात आला. हा नाऊथबाऊंड ट्राफिक साठी उघडण्यात आला आहे. हा मार्ग हाजी अली जंक्शन वरील आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत या मार्गावरून Bandra-Worli Sea Link ला जोडले जाणार आहे.

मुंबई कोस्टल रोड च्या कामासाठी 14,000 कोटी खर्च आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 किमी रोडचं 91% काम पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे. कोस्टल रोडचं उर्वरित काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 01, 2024 10:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).