CSMT Bridge Collapse: हिमालय पुल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांकडून पहिले आरोपपत्र न्यायालायत सादर

सीएसएमटी (CSMT) हिमालय पूल दुर्घटना प्रकरणातील मुंबई पोलिसांकडून पहिले आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

Mumbai CSMT footover bridge collapses; several likely injured | (Photo Credits: Twitter)

सीएसएमटी (CSMT) हिमालय पूल दुर्घटना प्रकरणातील मुंबई पोलिसांकडून पहिले आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. या आरोपत्रात घटनेचे सीसीटीव्ही फुटेज, मुख्य आरोपी ऑडिटर नीरज देसाई याचे स्पष्टीकरण आणि साक्षीदारांचा जबाब अशा प्रकारच्या विविध गोष्टी नमूद केल्या आहेत.

तर अटक करण्यात आलेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विरोधात लवकरच स्वतंत्र पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. दुर्घटननेनंतर या पुलाचे ऑडिट करण्यात आल्यानंतर पुलाचा काही भाद हा गंजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीतील पुलामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येतो असे अनेकांनी म्हटले आहे.(CSMT Bridge Collapse: BMC कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांनाही अटक)

परंतु नीरज देसाई यांच्या कंपनीने हा पुल नागरिकांच्या रहदारीसाठी सुरक्षित असल्याचे पालिकेला अहवालात सांगितले होते. मात्र 14 मार्च रोजी पुलाचा बहुतांश भाग खाली कोसळून 7 जणांचा मृत्यू आणि 31 जण जखमी झाल्याची घटना घडली होती. सध्या नीरज देसाई यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.