मुंबई सेंट्रल येथील नागपाडा परिसरात भीषण आग; 5 जण गंभीर जखमी (पहा व्हिडीओ)
दक्षिण मुंबई (South Mumbai) मधील मुंबई सेंट्रल (Mumbai Central) या परिसरात आज सकाळी 10 च्या सुमारास धुराचे लोट पाहायला मिळत होते, सिटी सेंटर मॉल (City Center Mall) मागे फारस रोड वर लागलेल्या भीषण आगीमुळे (Fire) ही परिस्थिती उद्भवली आहे.
दक्षिण मुंबई (South Mumbai) मधील मुंबई सेंट्रल (Mumbai Central) या परिसरात आज सकाळी 10 च्या सुमारास धुराचे लोट पाहायला मिळत होते, सिटी सेंटर मॉल (City Center Mall) मागे फारस रोड नागपाडा परिसरात (Nagpada Area) वर लागलेल्या भीषण आगीमुळे (Fire) ही परिस्थिती उद्भवली आहे. सुदैवाने यात 5 जण गंभीर जखमी झाले असुन अन्य कोणतीही जीवित हानी झाली नाही.सध्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहचले असुन आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत. (ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या आगीत 48 कोटी प्राणी आणि पक्षांचा होरपळून मृत्यू)
ही आग का लागली, नेमकी कधी लागली याबाबत सविस्तर वृत्त अद्याप हाती आलेले नसले तरीही या दुर्घटनेचा एक व्हिडीओ सध्या ट्विटर वर पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ फारस रोड वरील रहिवाशी परिसरातील असून धुराचे प्रमाण पाहता आगीच्या तीव्रतेचा अंदाज येतो.
ANI ट्विट
दरम्यान, मागील काही काळात मुंबईत अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या, अगदी दोन आठवड्यांपूर्वीच मुंबईच्या घाटकोपर परिसरात खैरानी रोड परिसरातील एका बांबू गोदामाला भीषण आग लागली होती. या परिसरात बांबू व्यावसायिकांची मोठ-मोठी गोदामं असून यातील काही गोदामांचे आगीत मोठे नुकसान झाले होते.