Pravin Darekar: मुंबै बँक प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

त्यामुळे आगामी काळात भाजपसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई येथील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये (Mata Ramabai Ambedkar Marg Police Station) दरेकरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Pravin Darekar | (Photo Credit : Facebook)

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई येथील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये (Mata Ramabai Ambedkar Marg Police Station) दरेकरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मजूर असल्याचे भासवत प्रविण दरेकर यांनी मुंबै बँकेचे (Mumbai Bank) हजारो ठेविदार आणि सरकारची वर्षानुवर्षे फसवणुक केली, असा आरोप आम आदमी पक्षाने केला होता. याच आरोपावरुन आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे (AAP Dhananjay Shinde) यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविण दरेकर यांच्यावर केलेल्या आरोपात धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे की, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे पाठिमागील अनेक वर्षांपासून मुंबई बँकेचे ठेवीदार आणि सरकारची फसवणूक करत आहेत. आपण मजूर असल्याचे ते बोगसपणे दाखवत आहेत. महत्त्वाचे म्हणजे 2014 ते 2019-20 या काळात ते मुंबई बँकेचे अध्यक्ष होते. या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दरेकर यांची मुंबै बँकेच्या अध्यक्ष पदावर निवड झाली. (हेही वाचा, Sana Malik On Devendra Fadnavis: नवाब मलिकांची मुलगी सना मलिकची देवेंद्र फडणवीसांवर टीका, म्हणाल्या तुम्ही दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकासोबत दिसला होतात)

धनंजय शिंदे यांनी पुढे म्हटले आहे की, सहकार विभागाच्या चौकशी अहवाल व चाचणी लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे की, 2014-15 ते 2019-20 या काळात प्रविण दरेकर आणि त्यांच्या गँगने मुंबै बँकेत जवळपास 2000 कोटींचा आर्थिक घोटाळा व नियम धाब्यावर बसवून काम केले आहे.

प्रविण दरेकर हे 'रंगारी' मजूर असल्याची नोंद 'प्रतिज्ञा सहकारी मजूर संस्थे'त आहे. या संस्थेत ते रंगारी मजूर असल्याचे कागदोपत्री तरी दिसते. त्यामुळे पाठिमागच्या काळात भ्रष्टाचाराचा बराच रंग त्यांनी मुंबै बँकेला लावला आहे. सहकार विभागानेही प्रतिज्ञाै मजूर संस्थेचे पाठिमागील पाच वर्षांपूर्वीचे परीक्षण केले. त्यात अनेक मजूर बोगस असल्याचे पुढे आले. त्यामुळे श्रीमंत असलेल्या प्रविण दरेकर नामक मजुराने आतापर्यंत किती मजुरी केली आणि त्यासाठी त्यांना किती मोबदला मिळाला याबाबत लेखाजोखा मांडावा असे अवाहनच धनंजय शिंदे यांनी दिले आहे.