Mumbai Air Pollution: मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली; मालाड पश्चिम येथे ‘खराब’ AQI नोंदवला (Watch Video)
वेधशाळेने शहरातील सर्वात वाईट वायू प्रदूषण पातळी मालाड पश्चिम येथे नोंदवली. 202 चा वायु गुणवत्ता निर्देशांक नोंदवला.
Mumbai Air Pollution: शहरातील विविध भागांमध्ये एकूणच हवेची गुणवत्ता ढासळल्याने मुंबईतील काही भाग रविवारी हवेतील धुक्याची चादर पहायला मिळाली. वेधशाळेने शहरातील सर्वात वाईट वायू प्रदूषण पातळी मालाड पश्चिम येथे नोंदवली. 202 चा वायु गुणवत्ता निर्देशांक मालाड पश्चिम येथे नोंदवला गेला. जो सर्वात खराब हवा दर्शवतो. 'खराब' AQI श्रेणी 201-300 पर्यंतच्या मर्यादेत असते. जी CPCB च्या मते, अशा हवेत बहुतेक लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. शहरातील इतर अनेक भागात रविवारी 'मध्यम' श्रेणीतील AQI पातळी नोंदवली गोला. 'मध्यम' AQI श्रेणी, 101-200 पर्यंत, फुफ्फुसाचा त्रास, दमा किंवा हृदयाची स्थिती नाजूक असलेल्या व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होऊ शकते. (Delhi Air Pollution: दिल्ली-एनसीआरमध्ये वायू प्रदूषणाचा स्तर खालावला, मुंबईची स्थिती चांगली)
मरीन ड्राइव्हला परिसरातील वाढत्या धूळ आणि प्रदूषणाच्या पातळीबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. "येथे सुरू असलेल्या बांधकामामुळे हे प्रदूषण होते; पूर्वी असे नव्हते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. मी रोज इथे येतो कारण इथे ताजेतवाने वाटते. पण आता धूळ आणि प्रदूषण वाढले आहे," असे ANI ला दिलेल्या मुलाखतीती एकाने सांगितले. भायखळा, चेंबूर, छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एयरपोर्ट, देवनार, घाटकोपर आणि कांदिवली पश्चिम भागात AQI 'मध्यम' श्रेणीत नोंदवला गेला.
दरम्यान, कुलाबा, कांदिवली पूर्व, मुलुंड पश्चिम आणि पवई येथील वेधशाळांनी 'समाधानकारक' श्रेणीतील AQI पातळी नोंदवली. 51-100 चा AQI या वर्गवारीत येतो, ज्यामुळे संवेदनशील व्यक्तींना श्वास घेण्यात किरकोळ त्रास होतो. इतरत्र, रविवारी दिल्लीची हवेची गुणवत्ता खराब झाली, सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) नुसार, 'अत्यंत खराब' श्रेणीतील AQI 352 होता. शनिवारच्या 255 च्या सरासरी AQI वरून ही पातळी लक्षणीयरित्या वाढली आहे.