वारिस पठाण यांना '100 कोटी जणांवर आम्ही 15 कोटी महागात पडणार..' वक्तव्य भोवलं, AIMIM कडून माध्यमांशी बोलण्यावर बंदी
दरम्यान औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी वारिस पठाण यांच्या वक्ताव्यावर स्पष्टीकरण मागणार असल्याचं सांगितले आहे.
AIMIM चे प्रवक्ता आणि भायखळाचे माजी आमदार वारिस पठाण (Waris Pathan) यांना '15 कोटी आहोत पण 100 कोटींवर भारी पडू' असं वादग्रस्त भोवलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, AIMIM पक्षाने वारीस पठाण यांच्यावर कारवाई करत त्यांना पुढील आदेशापर्यंत मीडीयामध्ये बोलण्यावर बंदी घातली आहे. दरम्यान औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी वारिस पठाण यांच्या वक्ताव्यावर स्पष्टीकरण मागणार असल्याचं सांगितले आहे. दरम्यान त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे हिंदू- मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊ शकतं. त्यामुळे या विरोधात पुणे, अंधेरीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान वारिस पठाण यांनी CAA,NRC च्या विरोधात बोलताना पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. वारिस पठाण यांनी 'आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या आहेत. तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण 15 कोटी असून 100 कोटींवर भारी पडू शकतो. ' अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजापाकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. दरम्यान 'मी संविधानाच्या मर्यादेमध्ये राहून वक्तव्य दिलं आहे, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, जे लोक विरोध करत आहेत ते कायद्याच्या विरोधात आहेत.' ‘आम्ही 15 कोटी, 100 कोटींवर भारी पडू’; AIMIM नेते वारिस पठान यांचे वादग्रस्त वक्तव्य (Video).
वारिस पठाण यांचं विधान
वारिस पठाण यांच्या विधानाचा देशभरातून निषेध करण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्रात मनसेकडून बाळा नांदगावकर, शालिनी ठाकरे यांनी वारिस पठाण यांच्या वक्ताव्याचा निषेध केला आहे. तर नेते मंडळींसोबत आता जावेद अख्तर यांनी देखील वारिस पठाण यांना खडे बोल सुनावले आहेत.