IPL Auction 2025 Live

Rape on Pretext of Marriage: लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; टीव्ही अभिनेत्रीचा वैमानिकावर आरोप, ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

तो तक्रारदार महिलेसोबत सातत्याने फोनच्या माध्यमातून संपर्कात राहात असे. दोघांमध्ये सोशल मीडियावर चॅटद्वारे संवादही होत असे.

Rape | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

टीव्ही अभिनेत्री (TV Actor) आणि मॉडेल असलेल्या एका महिलेने एका वैमानिकावर बलात्काराचा (Rape) आरोप केला आहे. लग्नाचे आमिष दाखवून पायलटने आपल्यावर वारंवार बलात्कार (Rape on Pretext of Marriage) केला असा आरोप या महिलेने पायलटवर केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन संबंधित पायलटवर मुंबई येथील ओशिवारा पोलीस स्टेशन (Oshiwara Police Station) मध्ये गुन्हा सोमवारी (18 जानेवारी) दाखल करण्यात आला आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, संबंधित आरोपी आणि महिला यांची ओळख डिसेंबर 2020 मध्ये एका मैट्रिमोनियल साइटच्या माध्यमातून झाली. दोघांचा परिचय झाला. त्यातून मैत्री वाढली. पायलटने तरुणीला लग्नाचे वचन दिले. त्यातून त्याने तिच्यावर बलात्कार केला. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला, असे महिलेचे म्हणने आहे.

तक्रारीत असलेल्या उल्लेखानुसार आरोपी मूळचा भोपाळचा रहिवासी असून सध्या तो मुंबई येथे राहतो. तो तक्रारदार महिलेसोबत सातत्याने फोनच्या माध्यमातून संपर्कात राहात असे. दोघांमध्ये सोशल मीडियावर चॅटद्वारे संवादही होत असे. पोलिसांनी म्हटले की, महिलेने आरोपीला 10 दिवसांपूर्वी संपर्क केला आणि त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. (हेही वाचा, मुंबई: नग्न फोटो दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 21 वर्षीय तरुणाला झाली 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा)

अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार असलेली अभिनेत्री, मॉडेल महिला ही मुंबईमध्ये एटकीच राहते. तिने आरोपीला घरी बोलवल्याचे तिने म्हटले आहे. घरी आल्यावर पायलट असलेल्या आरोपीने तिच्यासोबत गैरवर्तन केले. तक्रारदार महिलेने म्हटले आहे की, आरोपीने तिला आपल्या नातेवाइक आणि आईवडीलांशी बोलून लग्न करण्याचे अश्वासन दिले. मात्र, पुढे आरोपीने आपला निर्णय बदलला आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. आरोपीच्या वर्तनाला कंटाळून महिलेने पोलिसांत फसवणूक आणि बलात्काराची तक्रार दिली. मुंबई पोलिस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.