Mumbai: वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवर दीड किमी फरपटत नेले; 19 वर्षीय तरुणावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

चौधरी गाडीवरून खाली पडतील या उद्देशाने तो गाडी चालवतच राहिला. चालकाने बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे त्याच्या जवळच्या इतर वाहनांनाही धोका निर्माण झाला होता.

Image For Representation (Photo Credits-Facebook)

मुंबईच्या (Mumbai) वसई (Vasai) परिसरात एका पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून दीड किलोमीटर फरपटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस सोमनाथ चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी कार चालकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

माणिकपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई येथील वाहतूक पोलीस हवालदार सोमनाथ चौधरी हे रविवारी संध्याकाळी ड्युटी करत होते. त्यावेळी एका गाडीने सिग्नल तोडल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ताबडतोब गाडीला थांबण्याचा इशारा केला. मात्र त्याऐवजी, कार चालकाने गाडी कथितपणे हवालदाराच्या दिशेने वळवली.

आपल्यासमोरून गाडी येत आहे हे पाहता चौधरी यांनी या i20 हॅचबॅकच्या बोनेटवर उडी मारली व ते त्यावर बसले. त्यानंतर पोलीस आणि इतर प्रवासी त्यांच्या बचावासाठी येईपर्यंत सुमारे दीड किलोमीटर ते कारच्या बोनेटवर बसून होते. कार चालकाने त्यांनी तसेच दीड किलोमीटर फरपटत नेले. त्यानंतर चौधरी यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारदार सोमनाथ चौधरी हे मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांच्या वाहतूक शाखेत कार्यरत आहेत.

सायंकाळी 7.15 च्या सुमारास चौधरी हे वसई ते गोखिवरे मेन रोड दरम्यान वसंतगिरी सिग्नल येथे वाहतूक व्यवस्थापित करत असताना हा प्रकार घडला. यावेळी कारने लाल सिग्नल तोडल्यावर वाहतूक कोंडी झाली होती. कॉन्स्टेबल चौधरी यांनी जेव्हा कार चालकाला थांबण्याचा इशारा केला, तेव्हा तो त्यांच्या अंगावर आला. यावेळी आपला जीव वाचवण्याच्या हताश प्रयत्नात चौधरी यांनी बोनेटवर उडी मारली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव पाटील म्हणाले की, कॉन्स्टेबल चौधरी ड्रायव्हरला थांबायला सांगत राहिले, पण ड्रायव्हरने त्याकडे लक्ष दिले नाही. चौधरी गाडीवरून खाली पडतील या उद्देशाने तो गाडी चालवतच राहिला. चालकाने बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे त्याच्या जवळच्या इतर वाहनांनाही धोका निर्माण झाला होता. त्यानंतर चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी त्याला पकडले. (हेही वाचा: Nashik Rail Accident: लासलगाव स्थानकात रेल्वे कर्मचार्‍यांनाच इंजिनने उडवलं; 4 जणांचा मृत्यू)

पाटील पुढे म्हणाले, त्यानंतर वसई येथील रहिवासी असलेल्या 19 वर्षीय ड्रायव्हरला पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला सोमवारी कोर्टात हजर केले असता, त्याला 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 308, 353 (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला करणे) आणि मोटार वाहनांच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



संबंधित बातम्या

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

New Zealand vs England: आपल्या अंतिम कसोटी सामन्यात टीम साऊदीने केला अनोखा विक्रम