मुंबई मध्ये UPI Transactions मध्ये आर्थिक फसवणूक करणार्यांसाठी खोटी बॅंक अकाऊंट्स बनवून देणार्याला अटक; प्रत्येक अकाऊंट मागे मिळवत होता 60 हजार रूपये
UPI transactions बाबत अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर NPCI ने बॅंकेवर कारवाई केली.
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका 22 वर्षीय तरूणाला मालाड (Malad) मधून अटक केली आहे. त्याच्यावर फसवणूक करणार्यांसाठी बनावट बॅंक खाती बनवून देण्याचा आरोप आहे. या खात्यांमध्ये आर्थिक फसवणूक करणारे पैसा गोळा करत होते. बनावट अकाऊंट बनवून दिल्यावर त्याला कमिशन देखील मिळत होते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Mid-day च्या रिपोर्ट्सनुसार हा प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा एका एनजीओ कडून बॅंकेला दंड ठोठावण्यात आला. National Payments Corporation of India (NPCI)कडून मालाड मधील एका कंपनीकडून 10.96 लाख रूपये घेण्यात आले. यामध्ये व्हेरिफिकेशन शिवाय युपीआय ट्रान्झॅक्शन केली जात होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, मालाड च्या Equitas Small Finance Bank मध्ये 3 महिन्यात हजारो ट्रान्झॅक्शन झाली आहेत. UPI transactions बाबत अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर NPCI ने बॅंकेवर कारवाई केली. NPCI मध्ये आलेल्या तक्रारीत व्यवहार दोन ट्रॅव्हल एजंसीकडे होत असल्याचं सांगण्यात आले. त्यामध्ये Sky Bright Travels आणि Life and Travel चा समावेश आहे.
तक्रारी आल्यानंतर NPCI ने बॅंक खाती गोठवली. त्यानंतर झोनल ऑपरेशंस मॅनेजर संतोष म्हात्रे याची चौकशी केली. तेव्हा 2 बॅंकेची Gumasta license बनावट असल्याचं समोर आलं. ही अकाऊंट्स Rajan Kumar आणि Amit Balraj यांच्या नावे काढण्यात आली आहे. हे दोघही हरयाणाचे रहिवासी आहेत.
पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी चंद्रप्रकाश वैष्णव याला अटक केली आहे. जो बनावट अकाऊंट्स बनवायला मदत करत होता. पोलिसांनी दोन बनावट आधार कार्ड्सदेखील त्याच्याकडून जप्त केली आहेत. तर राजस्थानच्या भिलवाडा भागाचा असलेला आरोपी देखील बनावट अकाऊंट्स तयार करण्यात मदत करत होता. प्रत्येक बनावट अकाऊंट निर्मितीच्या मागे त्याला 60 हजार रूपये मिळत होते.