IPL Auction 2025 Live

Mumbai Sion Bridge: सायन पूल एक ऑगस्टपासून बंद होणार, 2026 मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार

हा पूल वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)ने आपल्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये जाहीर केले आहे.

मुंबई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सायन येथील मध्य रेल्वे मार्गावरील 112 वर्षे जुना पूल पाडण्याच्या हालचालींना पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे. सायन पुर्व-पश्चिम परिसराला जोडणारा सायन ओव्हर ब्रिज हा मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून तोडून नवीन बांधण्यात येणार आहे. पूर्व-पश्चिम उपनगरात येजा करण्यासाठी वाहनचालक व प्रवाशांना मोठा वळसा पडणार आहे. सायन पूल ब्रिटिशकालीन असून, तो 1912 मध्ये बांधण्यात आला आहे. हा पूल वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)ने आपल्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये जाहीर केले आहे. (हेही वाचा - Mumbai Local Stunt Viral Video: मुंबई लोकलमध्ये स्टंट करणे पडले महागात; तरुणाने एक पाय आणि हात गमावला, मध्य रेल्वेने केलं ‘हे’ आवाहन)

पाहा पोस्ट -