ST चा 'आवडेल तेथे प्रवास' पास आता ऑनलाइन, 4 आणि 7 दिवसांचे पास घरबसल्या मिळणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 'आवडेल तेथे कोठेही प्रवास' योजनेतील ४ आणि ७ दिवसांचे पास ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. महामंडळाच्या संकेतस्थळावर आणि मोबाईल अ‍ॅपमध्ये ही सुविधा आहे. पासवर क्यूआर कोड असेल आणि प्रवासात तो स्कॅन करून तपासला जाईल.

ST चा 'आवडेल तेथे प्रवास' पास आता ऑनलाइन, 4 आणि 7 दिवसांचे पास घरबसल्या मिळणार
ST Bus (File Image)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी 'आवडेल तेथे कोठेही प्रवास' योजनेतील पास आता ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे प्रवाशांना पास काढण्यासाठी आगारात जाऊन हाती लिहून घेण्याच्या  पद्धतीने पास घेण्याची गरज राहणार नाही.

'आवडेल तेथे कोठेही प्रवास' ही एसटीची सवलत योजना आहे. या योजनेत 4 दिवस आणि 7 दिवसांचे पास बसच्या प्रकारानुसार दिले जातात. काही प्रकारांमध्ये आंतरराज्य प्रवासाचीही सुविधा आहे. प्रौढ आणि मुलांसाठी पासाचे दर वेगवेगळे आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये महामंडळाने या पासांच्या दरात वाढ केली होती.

परिपत्रकात काय आहे

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, या योजनेतील ४ दिवस आणि ७ दिवसांच्या पाससाठी ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच मोबाईल अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे.

पास कसा मिळणार

ऑनलाइन पास काढताना प्रवाशांना आवश्यक माहिती भरावी लागेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नियमानुसार पास मिळेल. प्रवाशांना हा पास प्रिंट स्वरूपात किंवा मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात दाखवता येईल. नक्की वाचा: NCMC कार्डचं ऑनलाईन रिचार्ज करूनही बॅलन्स दिसत नाहीये? 'या' एका स्टेपशिवाय पैसे कधीच जमा होणार नाहीत! 

क्यूआर कोडद्वारे तपासणी

ऑनलाइन मिळालेल्या पासवर क्यूआर कोड दिला जाईल. प्रवासादरम्यान वाहकाकडील ईटीआयएम मशीनद्वारे हा कोड स्कॅन केला जाईल. स्कॅन केल्यानंतर प्रवाशाचे नाव, पासचा प्रकार, पासची वैधता आणि इतर आवश्यक माहिती मशीनवर दिसेल. प्रवाशाने सादर केलेल्या ओळखपत्राचीही पडताळणी केली जाईल. नक्की वाचा: MSRTC प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता BHIM App द्वारे करता येणार NCMC कार्ड टॉप-अप .

पाससाठी लागणारी माहिती, दर आणि वैधतेच्या अटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अ‍ॅपवर तपासाव्यात. प्रवासात पासासोबत ओळखपत्र बाळगावे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2026 12:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).