MSRTC Driver Suicide: लातूर च्या उदगीर बस डेपो मध्ये ST बसचालकाची बस मध्येच आत्महत्या

ही घटना मंगळवार (5 ऑक्टोबर) च्या दुपारी घडली आहे.

Death penalty. (Photo Credits: Pixabay, Open Clip Art)

एसटी बस (ST Bus) मध्येच गळफास घेण्याचा अजून एक मनाला विषण्ण करणारा प्रकार समोर आला आहे. लातूरच्या (latur)  उदगीर (Udgir) तालुक्यामध्ये एका एसटी बस चालकाने बसमध्येच गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. संजय केसगिरे असं त्यांचं नाव असून बॅगेच्या बेल्टनेच त्यांनी गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उदगीर बस डेपो मध्ये एसटी थांबलेली असताना संजय केसगिरे यांनी स्वतःच्या बॅगेचा बेल्ट काढून गळफास घेतला. ही घटना मंगळवार (5 ऑक्टोबर) च्या दुपारी घडली आहे. त्यानंतर संजय यांना तातडीने रूग्णालयामध्ये हलवण्यात आले पण त्यापूर्वीच प्राणज्योत मालवली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान संजय यांनी आत्महत्या नेमकी का केली? हे अद्याप समजू शकलेले नाही पण त्यांच्या निधनाच्या वृत्ताने कर्मचारी वर्गाने हळहळ व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी अहमदनगर मध्येही अशाप्रकारे पाथर्डी-नाशिक बसच्या वाहन चालकाने बसमध्येच गळफास घेतला होता. त्यांनी आर्थिक चणचणीतून हे टोकाचं पाऊल उचल्याचं प्राथमिक अहवालातून सांगण्यात आले होते.

सध्या राज्य परिवहन मंडळाची आर्थिक स्थिती नाजूक आहे. आधीच डबघईला आलेल्या एसटीचं कोरोना संकटामध्ये पार कंबरडचं मोडलं. राज्य सरकारने सुरूवातीला काही आर्थिक मदत केली होती पण लॉकडाऊन निर्बंध शिथिल झाल्यानंतरही उत्पन्न वाढत नसल्याने एसटी कर्मचार्‍यांचा पगार रखडत आहे. त्यामुळे अनेकांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतले आहेत.