Monsoon Update: मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात काही भागात 16 जुलै पर्यंत मुसळधार पावसाचे अंदाज- IMD

12 जुलै ते 16 जुलै या काळात पावसासाठी अनुकूल हवामान असेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Monsoon 2020 | Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

Mumbai Rains Update: हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार येत्या आठवड्यात मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), रायगड (Raigad)  मधील काही भागात मुसळधार पाऊस होण्याचे अंदाज आहेत. 12 जुलै ते 16 जुलै या काळात पावसासाठी अनुकूल हवामान असेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यावेळी काही भागात मध्यम तर काही भागात तीव्र स्वरूपाचा पाऊस होईल. मुंबई व उपनगरात दिवसातून अधून मधून पाऊस होईल मात्र सलग सरी बरसणार नाहीत. मुंबई शहरामध्ये आज सकाळी काही ठिकाणी 15-20 मिनिटांसाठी जोरदार सरी कोसळल्या आहेत. या दमदर पावसानंतर मुंबईमध्ये पावसाने उसंत घेतली आहे. दुसरीकडे कोकणात मात्र काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे.

मुंबईत जुलै महिन्यात 840.7mm इतका पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच जवळपास 506.4 mm इतका पाऊस नोंदविण्यात आला. हा पाऊस जुलै महिन्यातील 60% पावसाइतका आहे.

ANI ट्विट

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र, औरंगाबाद, मराठवाडा, विदर्भ, पुणे शहरात अद्याप जोरदार असा पाऊस झालेला नाही मात्र पावसाची सद्य स्थिती सुद्धा समाधानकारक आहे. यंदा सरासरीच्या 100 टक्के पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.