IPL Auction 2025 Live

Monsoon Update: बळीराजा सुखावणार! येत्या 48 तासांत मान्सून केरळात धडकणार; राज्यातील 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

त्यामुळे मौसमी वाऱ्याची आतुरतेने वाट पाहत असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

Monsoon Update: येत्या 48 तासांत मान्सून (Monsoon)केरळात धडकण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यांनंतर 3-4 दिवसात मान्सून राज्यात दाखल होईल. त्यामुळे बळीराजांसह शहरातील कामगार वर्ग चांगला सुखावला आहे. मुंबईसह उपनगर, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बुधवारी आणि गुरुवारी पावसाची(Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त(Weather Update)करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. (हेही वाचा:Maharashtra Weather Forecast: पुढील 48 तासात मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता )

शेतीच्या मशागतीला वेग द्यावा, पेरणीपूर्वीची कामे आटोपून घ्यावी, असंही सांगण्यात आलं आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. त्यामुळे अनेक शहरांना पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे.

मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 30 मे रोजी मान्सून केरळात दाखल होईल. त्यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत 10-12 जूनच्या सुमारास मान्सून दाखल होऊ शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.