Monsoon Update: मान्सून लांबणीवर; 4 ते 5 दिवस उशीराने केरळ आणि महाराष्ट्रात होणार दाखल

जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होतो. भारतीय हवामान विभागाने सांगितलं की, मे महिन्याच्या मध्यापासून ते 4 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचेल. पण केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज चुकला आहे.

Monsoon | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतीय हवामान खात्याने (IMD) आता मान्सून (Monsoon) तीन ते चार दिवस उशीराने दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये (Kerala) 4 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. पण अद्याप केरळमध्ये मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सूनची प्रतिक्षा लांबली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून आता लक्षद्विपपर्यंत पोहोचला आहे. केरळमध्ये मान्सून तीन ते चार दिवस उशिराने येण्याची शक्यता आहे. मान्सून लांबणीवर गेल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पहायला मिळत असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही काही दिलासा अद्याप मिळण्याची चिन्ह दिसत नाही आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होतो. भारतीय हवामान विभागाने सांगितलं की, मे महिन्याच्या मध्यापासून ते 4 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचेल. पण केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज चुकला आहे. 4 जून रोजी पश्चिमेकडील वाऱ्यांची खोली सरासरी समुद्रसपाटीपासून 2.1 किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. आग्नेय अरबी समुद्रावरील ढगांचे प्रमाणही वाढत आहे. पुढील तीन-चार दिवसांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. हवामान विभागाने रविवारी एका निवेदनात म्हटलं आहे की, दक्षिण अरबी समुद्रावरील पश्चिमेकडील वाऱ्यांच्या वाढीमुळे परिस्थिती अनुकूल होत आहे. तसेच, पश्चिमेकडील वाऱ्यांची खोली हळूहळू वाढत आहे.

महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. पण आता मान्सून तीन ते चार दिवस उशिराने येणार असल्याने महाराष्ट्रातही पावसाला विलंब होणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) रविवारी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये 7 ते 8 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात साधारणपणे 13 ते 15 जून दरम्यान पाऊस सुरु होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement