Maharashtra Rain Update: यंदा मुंबईत मान्सून उशिरा येणार शक्यता, स्कायमेटने वर्तवला अंदाज

स्कायमेट ही हवामान अंदाज वर्तवणारी खाजगी संस्था आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार केवळ मुंबई आणि महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात अशीच परिस्थिती असणार आहे.

Heavy Rains | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

यंदा मान्सून (Rain) उशिरा येणार आहे. गेल्या वर्षी 9 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता. मात्र यंदा मान्सूनचे आगमन होण्यास 15 दिवसांचा विलंब होऊ शकतो. गेल्या वर्षी भरपूर पाऊस झाला होता, मात्र यंदा महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा दुष्काळाची समस्या निर्माण होऊ शकते. आगामी काळातील हवामानाचा हा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. स्कायमेट ही हवामान अंदाज वर्तवणारी खाजगी संस्था आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार केवळ मुंबई आणि महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात अशीच परिस्थिती असणार आहे.

यावेळी मान्सून 1 जूनच्या आसपास येण्याऐवजी 4 जूनला केरळमध्ये दाखल होईल. स्कायमेटने एकीकडे देशभरात मान्सून उशिरा येणार आहे, तर दुसरीकडे कमी पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हे एल-निनोमुळे आहे. एल-निनोच्या प्रभावामुळे देशात मान्सूनचे आगमन 5 ते 6 दिवस उशिराने होईल. केरळसह दक्षिण भारतात मान्सून उशिरा पोहोचणार असल्याने तो मुंबईतही उशिरा दाखल होणार आहे. हेही वाचा Aaditya Thackeray Tweet: निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंचे ट्विट चर्चेत

मुंबईत मान्सूनच्या आगमनाला आठवडाभर उशीर होण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पाऊस थोडा अगोदर पडेल, असे स्कायमेटकडून सांगण्यात आले असले, तरी मुंबईकरांची पावसाळ्याची प्रतीक्षा गेल्या वर्षीच्या तुलनेत लांबणार आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार मुंबईत मान्सून उशिरा दाखल होणार असला, तरी मान्सूनच्या आगमनानंतर पाऊस चांगलाच बरसणार आहे. असे असताना मराठवाडा आणि विदर्भात असे होणार नाही. तेथे पुन्हा एकदा दुष्काळाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

स्कायमेटच्या या अंदाजामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. स्कायमेटने हवामानातील या बदलाचे कारण एल निनो प्रभाव असल्याचे सांगितले आहे. मान्सूनचे वारे कमी दाबाच्या क्षेत्राकडे आकर्षित होतात. मे-जूनमध्ये समुद्राच्या तुलनेत भूपृष्ठावरील जमीन अधिक उष्ण असल्याने, मान्सूनचे वारे समुद्राकडे जाण्याऐवजी देशाच्या अंतर्गत भागात पाऊस आणतात. हेही वाचा Cheetah Reintroduction Plan in India: बारा चित्त्यांना साऊथ आफ्रिकेतून घेऊन येणार IAF C-17 Globemaster Aircraft मध्य प्रदेशच्या Gwalior मध्ये दाखल (Watch Video)

पण एल निनोच्या प्रभावामुळे हा प्रवाह उलटतो. त्याच्या प्रभावामुळे प्रशांत महासागरात समुद्राचा पृष्ठभाग तापू लागतो. त्यामुळे मान्सून देशाच्या अंतर्गत भागातून विखुरून समुद्राकडे जातो. त्यामुळे देशात उशिरा मान्सून किंवा दुष्काळ यांसारख्या समस्या निर्माण होतात.