Maharashtra Monsoon 2021 Update: येत्या 2-3 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता
त्यानंतर उद्यापर्यंत केरळच्या उर्वरीत भाग मान्सून व्यापेल असं हवामान खात्याने म्हटलं आहे. त्याचबरोबर लक्षद्वीप, तामिळनाडू, पुडुचेरी, दक्षिण कर्नाटकपर्यंत पोहण्याची शक्यता आहे.
मान्सून (Monsoon) काल केरळात (Kerala) दाखल झाला. त्यानंतर उद्यापर्यंत केरळच्या उर्वरीत भाग मान्सून व्यापेल असं हवामान खात्याने म्हटलं आहे. त्याचबरोबर लक्षद्वीप, तामिळनाडू, पुडुचेरी, दक्षिण कर्नाटकपर्यंत पोहण्याची शक्यता आहे. आज मान्सून अजून पुढे सरकला असून महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. पुढील 2-3 दिवसांत मान्सून मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये आणि महाराष्ट्र, गोव्यात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
यामुळे उन्हाने त्रासलेल्या राज्यातील सर्व नागरिकांना, बळीराजाला आनंदवार्ता मिळाली आहे. दरम्यान, केरळमध्ये मान्सून 1 जून रोजी दाखल होईल असा अंदाज होता. मात्र त्यास काहीसा विलंब झाला असला तरी काल मान्सूने केरळमध्ये हजेरी लावली आणि आता उर्वरीत देश मान्सूनच्या प्रतिक्षेत आहे.
K S Hosalikar Tweet:
त्याचबरोबर पुढचे 2-3 दिवस राज्यात बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठाणे, रायगड, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आणि देशात पावसाळ्याची सुरुवात झाली, याची माहिती आयएमडीचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी सांगितले. केरळमध्ये मान्सून दाखल होताच काही भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. केरळमधील पठानमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, कोझीकोड, कन्नूर आणि कासरगोड या 8 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.