Monsoon 2020 in Konkan Updates: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या 24 तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता; जाणून घ्या 10-15 जून दरम्यानचा हवामान अंदाज
दरम्यान रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागामध्ये पुढील 24 तासामध्ये विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस बरसू शकतो.
यंदा 1 जूनला केरळमध्ये मान्सूनचं दमदार आगमन झाल्यानंतर आता महाराष्ट्रात सामान्य नागरिकांसोबतच शेतकर्यांना मान्सूनची उत्सुकता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 24 तासामध्ये महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. दरम्यान रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागामध्ये पुढील 24 तासामध्ये विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस बरसू शकतो. दरम्यान 3 जून दिवशी कोकणार रत्नागिरी, रायगड भागामध्ये निसर्ग चक्रीवादळाने मोठं नुकसान झालं आहे. अनेक लहान मोठ्या गावांमध्ये संपर्क अद्याप होऊ शकलेला नाही.
हवामान विभागाने काही दिवसांपूर्वीच बंग़ालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेल्या साऊथवेस्ट मान्सून राज्यात सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण असल्याचं म्हटलं होतं. तसेच यापूर्वीदेखील मुंबई सह महाराष्ट्रात यंदा मान्सून सक्रिय होण्याची सरासरी तारीख 11 जून वर्तवण्यात आली होती.
कोकणातील पुढील 4-5 दिवसांचा मान्सून अंदाज
सध्या कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला. त्यानंतर शरद पवार कोकणाच्या दौर्यावर आहेत. तर उद्यापासून देवेंद्र फडणवीस देखील जाणार आहेत.