या भीतीने मी अंगावरचे कपडे काढले ; मॉडेलचा खुलासा

ओशिवारा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या एका मॉडेलने पोलीस आणि सुरक्षा रक्षकांसोबत हुज्जत घालत कपडे उतरवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

प्रतिकात्मक फोटो (PHoto Credit- Pixabay)

दोन दिवसांपूर्वी मद्यधुंद मॉडेलने अंगावरचे कपडे उतरवून हंगामा केल्याचा व्हिडिओ आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. ओशिवारा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या एका मॉडेलने पोलीस आणि सुरक्षा रक्षकांसोबत हुज्जत घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. सिगरेट आणून देण्यास नकार दिल्याने या मॉडेलने हे पाऊन उचलले होते. पण आता खुद्द मॉडेलने त्या रात्री नेमके काय घडले, हे सांगितले आहे. शिपायाने सिगारेट दिली नाही म्हणून मॉडल झाली नग्न

माझ्यावर बलात्कार तर होणार नाही ना? या भीतीने मी माझ्या अंगावरचे कपडे काढले, असा धक्कादायक खुलासा मॉडेलने केला आहे. मध्यरात्री अडीच वाजता पोलीसांनी तुला आता आमच्यासोबत यावे लागेल असे सांगितले. त्यांच्यासोबत महिला पोलिसही नव्हत्या. मग मी त्यांच्यासोबत कशी जाणार? या सगळ्या गोंधळात मला नेमके काय करावे हे सूचले नाही आणि म्हणून मी अंगावरचे कपडे काढले. त्यानंतर पोलीस तिथून निघून गेले.

पुढे ती म्हणाली की, इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला मी सिगारेट आणण्यास सांगतिले. पण ड्युटीवर असल्यामुळे त्याने नकार दिला. पण तिथे दोन सुरक्षा रक्षक असल्याने मी एकाला गेटबाहेर जावून सिगारेट आणण्याची विनंती केली. पण त्याने नकार दिला. याउलट त्याने मला सिगारेट विकणाऱ्याचा नंबर दिला. पण रात्रीचा 1 वाजल्याने तो झोपला असावा. त्यानंतर मी स्वतः बाहेर जावून सिगारेट आणली.

परत येताना मी त्या सुरक्षा रक्षकाला म्हटलं की, इतक्या रात्री मला जावून सिगारेट आणावी लागली. तुमच्यापैकी कोणी गेलं असतं तर बरं झालं असतं. तर त्यावर सुरक्षा रक्षक माझ्याशी आवाज चढवून बोलू लागला. तू चरित्रहीन मुलगी आहेस. राजकुमारी नाहीस की मी तुला सिगारेट आणून देऊ. अशाप्रकारे उद्धटपणे बोलू लागला. त्यावेळी मला राग आला आणि मी त्याच्या थोबाडीत मारली. मी दुसऱ्या वॉचमनने आम्हाला थांबवले. मग तीन-चार जण मिळून मला शिव्या देऊ लागले. त्यानंतर मात्र मी पोलिसांना फोन केला.

पोलिस आल्यावर मी त्यांना लगेचच सर्व प्रकार सांगितला. वॉचमन मात्र काही बोलत नव्हता. तो पोलिसांशीही उद्धटपणे वागत होता. मग पोलिसांनी मला पोलिस स्टेशनला जाण्याची विनंती केली. पण मी इतक्या रात्री येऊ शकणार नाही असे त्यांना सांगितले. तसंच तुमच्यासोबत महिला पोलिसही नसल्यामुळे मी सकाळी पोलिस स्टेशनला येते, असे त्यांना सांगितले. पण एका पोलिसाने हे मान्य केले पण इतर पोलीस मला पोलीस स्टेशनला चल असे सांगू लागले. त्यावेळेस चार वॉचमन आणि चार पोलिसांच्या गराड्यात सापडल्याने काय करावे हे मला सूचले नाही आणि म्हणून मी कपडे काढले असे स्पष्टीकरण या मॉडेलने म्हटले आहे.