MNS Sandeep Deshpande: कोरोना काळातील बीएमसीतील कथित घोटाळ्याचा मनसे आज पुराव्यांसह पर्दाफाश करणार
तरी ही पत्रकार परिषद संदिप देशपांडे पुराव्यासकट घेणार असुन दरम्यान नेमका कुणाचा पर्दाफाश करणार याबाबतची उत्सुकता शिगेला पेटली आहे.
कोरोना महामारी दरम्यान मुंबई महापालिकेत बरेच सगळे घोटाळे झालेत, मुंबईकरांना गंडवून त्यांची लूट करण्यात आली असे कायमचं आरोप प्रत्यारोप होताना आपण ऐकलं आहे. पण यावेळी मनसे मात्र पुराव्यांसह महापालिका प्रशासन आणि महापालिकेवर सत्ता असणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम असण्याची माहिती खुद्द मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिली आहे. कोरोना काळात मुंबईत कोरोना रुग्णांची मोठी संख्या, त्यांना पुरवण्यात आलेल्या सोयीसुविधा, कोरोनावर केलेल्या उपाय योजनांमध्ये कसं मुंबईकरांना गंडवण्यात आलं आहे याबाबतचा खुलासा थेट पत्रकार परिषद घेत मनसे करणार आहे. मनसे नेते संदिप देशपांडेंनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. यांत वीरप्पन गॅगचा सर्वात मोठा खुलासा संदिप देशपांडे करणार आहेत अशा आशयाचं ट्विट केलं आहे. तरी ही पत्रकार परिषद संदिप देशपांडे पुराव्यासकट घेणार असुन दरम्यान नेमका कुणाचा पर्दाफाश करणार याबाबतची उत्सुकता शिगेला पेटली आहे.
आज मनसे नेते संदिप देशपांडेंच्या निशाण्यावर उध्दव ठाकरेंची शिवसेना असणार की संपूर्ण महाविकास आघाडी सरकार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. कोरोणा काळात मुंबई महापालिकेवर उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेची सत्ता होती. तरी आता कोरोना काळातील घोटाळा नेमका कुणी केला, यांत जबाबदार कोण, संदिप देशपांडे कुणावर निशाणा साधणार, मनसेच्या रडारवर कोण असणार असे विविध प्रश्न उपस्थित होत आहे. (हे ही वाचा:- Balasaheb Thackeray Birth Anniversary 2023: उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर बीएमसी निवडणुकीसाठी आज करणार युतीची घोषणा)
तरी या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आज सकाळी ११ वाजता मिळणार आहेत. मनसे नेते संदिप देशपांडेंच्या या पत्रकार परिषदेत आणखी मनसेचे कुठले महत्वाचे नेते उपस्थित असणार, राज ठाकरे या घोटाळ्यावर काय भुमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तरी संदिप देशपांडेंची ही पत्रकार परीषद मनसे करीता नक्कीचं वादळी ठरु शकते. "तीन दिवसांपूर्वी संदिप देशपांडे कार्यालयात नसताना एक व्यक्ती कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह (Pen Drive) मनसे कार्यालयात ठेवून गेला. या पेन ड्राईव्हमध्ये कोरोना (Corona) काळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे आहे. हेच सगळे पुरावे आज संदिप देशपांडे पत्रकार परिषदेत जाहीर करणार आहेत. त्याचप्रमाणे, या पेन ड्राईव्हमध्ये मुंबईकरांची लूट कोणी आणि कशी केली याची माहिती तसेच बँक खात्यांचे पुरावेही असल्याचं देशपांडे यांनी म्हटलं होतं.