MLA Sanjay Gaikwad Beating Youth Video: आमदार संजय गायकवाड यांची तरुणाला काठीने बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. मात्र, आमदार महोदयांची ही दादागिरी कुठवर चालणार? असा सवाल विचालला जातो आहे.

Sanjay Gaikwad | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad Viral Video) आणि वाद हे आता समिकरणच झाले आहे. कधी वाघाची शिकार, कधी महिलेला जमीन हडप करुन जीवे मारण्याची धमकी, असे एक ना अनेक वाद संजय गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झाले आहेत. आताही हे आमदार महोदय पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आले आहेत. ही चर्चा त्यांच्या एका व्हिडिओमुळे आहे. आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) हातात काठी घेऊन भर गर्दीत एका तरुणाला बेदम मारहाण करतानाचा एक कथीत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. मात्र, आमदार महोदयांची ही दादागिरी कुठवर चालणार? असा सवाल विचालला जातो आहे. गायकवाड हे मुख्यमंत्री एकाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे सरकारमधील घटकांनीच असे वर्तन केले तर सामान्यांनी दाद मागायची तरी कोठे, असा सवाल उपस्थित होतो आहे.

शिवजयंती मिरवणुकीदरम्यान घडली घटना

सांगितले जात आहे की, हा व्हिडिओ 19 फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती मिरवणुकीतील आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. या गर्दीमधील जमावातून पोलीस एका युवकाला पकडत आहेत. दरम्यान, ते या युवकाला किरकोळ मारहाणही करत आहेत. याच वेळी आमदार संजय गायकवाड हे पोलिसाच्या हातातील काठी हिसकावतात आणि ती स्वत:च्या हातात घेत सदर तरुणाला बेदम मारहाण करताना दिसतात. तरुण खाली कोसळतो. तरुण जमीनिवर येताच आमदार महोदयांना आणखीच चेव येतो. जमीनीवर कसळलेल्या तरुणाला ते अमानुषपणे मारहाण करतात. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, Shiv Sena MLA Sanjay Gaikwad ON Narayan Rane: 'घरात घुसून हिशोब चुकता करु', शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा नारायण राणे यांना इशारा)

सोशल मीडियावर तीव्र संताप

आमदार महोदयांची दादागिरी पाहून सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होतो आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात अद्यापही कोणताही गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही. आमदार महोदयांनी हे कृत्य नेमके कोणत्या कारणास्तव केले हेदेखील पुढे आले नाही. पोलिसांनी या घटनेचा तपास करावा, अशी मागणी समाजातून होत आहे. (हेही वाचा, Shiv Sena MLA Sanjay Gaikwad: महाराज लोकांनी मंडपातून बायका पळवल्या तेव्हा संप्रदाय बदनाम नाही झाला का? शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा सवाल)

व्हिडिओ

सत्ताधारी आमदारांकडून बेशिस्त वर्तन

अलिकडी काही काळात सत्ताधारी आमदारांकडून होणारे बेशिस्त वर्तन वाढले आहे. विद्यमान सरकारच्या कार्यकाळात अनेक आक्षेपार्ह घटना घडल्या आहेत. आमदार सदा सरवणकर यांनी केलेला गोळीबार (काही काळाने पोलिसांनी त्यांना क्लिनचीट दिली.), मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल काढलेले अपशब्द, भाजप आमदार गणपत गाकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये केलेला गोळीबार, मंत्री दादा भुसे आणि एका आमदारामध्ये विधानसभा लॉबीत झालेली कधीत धक्काबुक्की यांसह इतरही अनेक घटनांचा आमदारांच्या आक्षेपार्ह वर्तनाचा समावेश आहे.