Aditya Thackeray: शिवसेना आमदार आदित्य ठाकरेकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Aaditya Thackeray | (Photo Credit - Twitter)

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर ( Vedanta-Foxconn Project) C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्पही गुजरातला गेल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली असुन आता शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी थेट उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या राजीनाम्याची (Resignation) मागणी  केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) वातावरण चांगलचं तापल आहे. आंतरराज्यीय गुंतवणुकीचे (Interstate Investment) संबंध लक्षात घेता मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (CM Shivraj Singh Chauhan), ओडिशाचे (Odisha) मुख्यमंत्री नवीन पटनायक (CM Naveen Patnaik) आणि राजस्थानचे (Rajasthan CM Ashok Gehlot)  मुख्यमंत्री अशोक गेहलोत महाराष्ट्रात आले, पण आमचे असंवैधानिक मुख्यमंत्री कुठेही गेले नाहीत. मी उपमुख्यमंत्री असतो तर मी राजीनामा दिला असता आणि नव्याने निवडणुकीसाठी निवडले अशी खोचक टीका करत आदित्य ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

 

आदित्य ठाकरे यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.  अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार हेक्टरची मदत करण्यात यावी अशी मागणी करतांना, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आदित्य यांनी केली. सरकारचे मंत्री बांधावर जायला तयार नाहीत. तर आम्ही पाहणीसाठी गेलो असता लोकांना कृषिमंत्री यांचे नाव देखील माहित नाही, त्यांना कोणी पहिले नसल्याचे शेतकरी म्हणाले. त्यामुळे कृषीमंत्री अब्दुल सत्तार राजीनामा देणार का? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारमधील आणखी एका मंत्र्यांच्या मंत्रीपदावर सडकून टीका केली आहे. (हे ही वाचा:- Mahavikas Aghadi Leader Security: महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सुरक्षेत मोठे बदल, शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय)

 

चौथा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून (Maharashtra) गेला आहे.या घटनाबाह्य सरकारमधील हे एक मोठं अपयश आहे. तर जनतेप्रमाणे उद्योजकांनाही या सरकारवर विश्वास राहिला नाही. महिनाभरापूर्वी सांगितलेला प्रकल्प महाराष्ट्रात येणार म्हणाले होते पण तो प्रकल्प आता हातून निसटला कसा असा सवाल शिवसेना आमदार आदित्या ठाकरेंनी (Aditya Thackeray) उपस्थित केला आहे.